भोकरदन : येथील ग्रामीण रुग्णालय परिसर.  
मराठवाडा

भोकरदनला उपजिल्हा रुग्णालयाची आस 

तुषार पाटील

भोकरदन(जि.जालना) -  येथील ग्रामीण रुग्णालयाची जिल्ह्यातील सर्वाधिक बाह्यरुग्ण असणारे म्हणून ओळख आहे. दररोज तीनशेवर रुग्ण तपासणीसाठी येथे येतात. शिवाय जिल्ह्यात सर्वाधिक प्रसूतीचे प्रमाण भोकरदन येथे आहे. विशेष म्हणजे आमदार संतोष दानवे यांच्या प्रयत्नातून पन्नास खाटांचे अद्ययावत उपजिल्हा रुग्णालयाची मान्यता मिळाली आहे; मात्र कार्यवाही थंडबस्त्यात आहे. परिसरातील नागरिकांनाही उपजिल्हा रुग्णालय कार्यान्वित होण्याची आस लागली आहे. त्यामुळे चांगल्या सुविधा तज्ज्ञ डॉक्‍टर उपलब्ध होतील असे नागरिकांना वाटते. 

येथील ग्रामीण रुग्णालयाची इमारत जुनी झाली असून आसपासची वस्ती व प्रमुख जालना रस्ता हा फारच उंचावर झाल्यामुळे पावसाळ्यात येथे पाणी साचण्याची व ड्रेनेजची समस्या उभी राहते. शिवाय रुग्णालयाच्या परिसरात काटेरी झुडपांचे साम्राज्य पसरले आहे. रुग्णालयात सेवा मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी होतात. दररोज रस्त्यावर होणारे अपघातातून जखमींना फक्त मलमपट्टी करून सिल्लोड, औरंगाबाद येथे रेफर केले जाते, वेळीच उपचार न मिळाल्याने अनेकांचा जीवही धोक्‍यात आलेला आहे. आता लोकप्रतिनिधी, राजकीय नेत्यांनी योग्य पाठपुरावा केल्यास लवकरच भोकरदन ग्रामीण रुग्णालय उपजिल्हारुग्णालयाकडे वाटचाल करेल, अशी आशा आहे. 

काय आहेत समस्या 

  •  दरवर्षी रुग्णालयाची पाहणी, अहवाल, मागणी, दुरुस्ती आदींचे इस्टीमेट काढले जाते; पण निधी कुठे गेला व काम का नाही झाले हे कुणीच सांगू शकत नाही. 
  •  डॉक्‍टर वेळेवर न आल्यामुळे अनेकदा वादावादीचे प्रकार. 
  •  एकच रुग्णवाहिका आहे त्यामुळे बऱ्याचदा त्रास होतो. रुग्णवाहिकेचे चालक बऱ्याचदा रात्रीच्या वेळी आर्थिक अडवणूक करीत असल्याच्या अनेकदा तक्रारी. 
  •  भोकरदनला एकमेव सोनोग्राफी केंद्र; मात्र अप-डाऊन करणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे ते ठराविक दिवशीच सुरू. 
  •  व्हेंटिलेटर, सीटीस्कॅन या सुविधांचा अभाव. 

खासगी दवाखान्यात उपचारासाठी जास्तीचे पैसे लागतात म्हणून दुखण्यात इथं यावं लागतंय; पण डाक्‍टर वेळेवर भेटत नाहीत. 
- भागाबाई बरडे, ग्रामस्थ, फत्तेपूर 

वाढत्या राहदारीमुळे शहर परिसरात वारंवार अपघात होतात. अशा रुग्णांना वेळीच उपचारासाठी गरज असते; मात्र बऱ्याचदा येथे डॉक्‍टर नसतात. 
- शेख हमद, रुग्णकल्याण समिती सदस्य, ग्रामीण रुग्णालय 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बॉलिवूड गाजवलेल्या 'या' अभिनेत्रीच्या पालक आणि भावाची नातेवाईकांनीच केलेली हत्या ! हालअपेष्टांनी वेढलेलं आयुष्य

Ambad News: अंबडमध्ये दुमजली इमारत कोसळली; दोनजण जखमी, सुदैवाने जीवितहानी टळली

Pune Crime : फटाके वाजवण्यावरून वाद; हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू

Rohit Sharma - Virat Kohli: 'थँक यू ऑस्ट्रेलिया! परत येऊ की नाही माहित नाही, पण...', सिडनीतील विजयानंतर विराट-रोहित झाले व्यक्त

Crime: आई आणि काकाला नको त्या अवस्थेत पाहिलं; लेकाचा पारा चढला, रागाच्या भरात भलतंच घडलं

SCROLL FOR NEXT