उदगीरला उप प्रादेशिक परिवहन कार्यालय मंजूर Sakal
मराठवाडा

Udgir News : उदगीरला उप प्रादेशिक परिवहन कार्यालय मंजूर

उदगीर येथील एकूण लोकसंख्या यांचा विचार करता स्वतंत्र उप प्रादेशिक परिवहन कार्यालय स्थापन करणेबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

सचिन शिवशेट्टे

उदगीर : उदगीर येथील एकूण लोकसंख्या यांचा विचार करता स्वतंत्र उप प्रादेशिक परिवहन कार्यालय स्थापन करणेबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्यानुसार येथे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी दर्जाचे एम.एच.५५ या नोंदणी क्रमांकासह नवीन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (डेप्युटी आर.टी.ओ) कार्यालय मंजूर झाले.

असून त्याची शुक्रवारी ( ता.१५) अधिसूचना राज्य शासनाच्या ग्रहविभागाने काढली आहे.या कार्यालयासाठी सरकारी अथवा भाडे तत्वावर जागा घेण्यास शासनाने मान्यता दिली आहे. नवीन पदांची निर्मिती होईपर्यंत समायोजनाने पदे भरण्याच्या सूचना आहे.

डेप्युटी आरटीओ, एआरटीओ, मोटार वाहन निरीक्षक, सहा दुय्यम मोटार वाहन निरीक्षक, लिपिक व शिपाई आदी पदे शेजारच्या कार्यालयातून घेतले जाणार आहेत. प्रादेशिक आधिकारी कार्यालय लातूर येथील कार्यालयातून पदे समायोजित केली जाण्याची शक्यता आहे.

उदगीर येथे आर.टी.ओ कार्यालय चालू करावी आशी मागणी मोटार वाहन चालक मालक संघटनेने केली होती. याची तात्काळ दखल घेवुन क्रिडा व युवक कल्याण मंञी संजय बनसोडे यांनी हे कार्यालय मंजुर केल्याबदल त्यांचे सर्व स्तरातून आभार व्यक्त करण्यात येत आहे.

एम.एच.५५ नवा नोंदणी क्रमांक

उदगीरसाठी एम.एच.५२ हा नवीन नोंदणी क्रमांक देण्यात आला आहे. त्याशिवाय एक इंटरसेप्टर वाहनालाही मंजुरी देण्यात आली आहे. कार्यालयासाठी लागणार खर्च व इतर खर्चाची आगामी अधिवेशनात तरतूद केली जाणार आहे. गृहविभागाचे अवर सचिव भरत लांघी यांनी याबाबतचा अध्यादेश जारी केला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Visarjan 2025 Live Updates : पुण्यातील मानाच्या तिन्ही गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

BCCI Sponsorship 2025 : नव्या प्रायोजकातून बीसीसीआय ४०० कोटींहून अधिक कमवणार? नेमका प्लॅन काय?

माेठी बातमी! 'शाळांना २० टक्के टप्पा अनुदानासाठी २० अटी'; प्रस्ताव ऑफलाइन अन्‌ आदेश मिळणार ऑनलाइन, अटी पूर्ततेची होणार खातरजमा

Mumbai Ganesh Visarjan 2025 : लालबागच्या राजासह मुंबईचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी विसर्जनासाठी सज्ज; सकाळपासूनच सुरू होणार मिरवणुका!

Asian Hockey Cup 2025 : भारत अंतिम फेरीपासून केवळ एक पाऊल दूर; आज चीनला हरविणे आवश्यक

SCROLL FOR NEXT