file photo 
मराठवाडा

Success Story : सवना येथे महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीची लागवड, युवा शेतकऱ्याचा यशस्वी उपक्रम

राजेश दारव्हेकर

हिंगोली : सेनगाव तालुक्यातील सवना येथील शेतकरी नितीन नायक यांनी दोन गुंठ्यामध्ये स्ट्रॉबेरी लागवडीचा प्रयोग यशस्वी केला आहे. आत्तापर्यंत स्ट्रॉबेरी उत्पादनातून त्यांनी ८० हजार रुपयाचे उत्पादन मिळवले आहे. पुढील काळात स्ट्रॉबेरीचे क्षेत्र वाढवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सेनगाव तालुक्यातील सवना येथील प्रगतशील शेतकरी नितीन नायक हे तीन वर्षापूर्वी महाबळेश्वर व परिसरामध्ये गेले होते. त्या ठिकाणी थंड वातावरणात येणाऱ्या स्ट्रॉबेरी बदल माहिती घेतली. व हा उपक्रम करण्याचा निश्चय केला. त्यामुळे त्यांनी सवना येथील वातावरण व महाबळेश्वर येथील वातावरणातील साम्य लक्षात घेतले. त्यानुसार सवना येथे स्ट्रॉबेरीचे लागवड करता येऊ शकते हे त्यांच्या लक्षात आले. मात्र पाच एकर शेती असताना स्ट्रॉबेरी लागवडीचा मोठ्या क्षेत्रावर प्रयोग करणे धोकादायक असल्यामुळे त्यांनी केवळ दोन गुंठ्यामध्येच प्रयोग करण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार पाचगणी येथून स्ट्रॉबेरीची अकराशे रोपे आणली. त्यानंतर ही रोपे दोन गुंठ्यात मच्छीलींग करुन लावली नोव्हेंबर महिन्यात रोपांच्या लागवडी नंतर फवारणी पाणी पाळी याकडे लक्ष दिले. अवघ्या दोन महिन्यात स्ट्रॉबेरीचे उत्पादन सुरु झाले जानेवारी महिन्यापासून स्ट्रॉबेरीचे उत्पादन सुरु झाले. जानेवारी महिन्यापासून स्ट्रॉबेरी तोडणी करुन स्थानिक बाजारपेठेत विक्रीला सुरुवात केली. सध्या स्ट्रॉबेरीला ४०० ते ५०० रुपये किलो भाव मिळाला वाशिम, कनेरगाव नाका व हिंगोली या बाजारपेठेत त्यांनी स्ट्रॉबेरीची विक्री केली आहे.

अवघ्या दीड महिन्यात त्यानी एक क्विंटल ६० किलो स्ट्रॉबेरीची विक्री केली आहे. त्यातून ८० हजार रुपयाचे उत्पन्न मिळाले असून आणखीन पंधरा ते विस दिवस उत्पन्न मिळणार आहे असे सांगितले.

केवळ थंड हवेच्या ठिकाणी येणाऱ्या स्ट्रॉबेरी लागवडीचा प्रयोग नितीन नायक यांनी हिगोली जिल्ह्यातील सवना गावामध्ये यशस्वी करुन दाखविला आहे. हा प्रयोग पाहण्यासाठी परिसरातील शेतकरी गर्दी करु लागली आहे. इतर पिकाच्या तुलनेत कमी लागवड क्षेत्रामध्ये चांगले उत्पन्न मिळत असल्याने पुढील काळात स्ट्रॉबेरी लागवडीचे क्षेत्र वाढविण्याचा विचार असून या भागातील तरुण शेतकऱ्यांनाही मार्गदर्शन करणार आहे. असे नितीन नायक यांनी सांगितले.

संपादन- प्रल्हाद कांबळे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! घरगणनेच्या काळातच शिक्षकांची ‘टीईटी’; २१ जूनला होणार शिक्षक पात्रता परीक्षा; २७ मार्च ते १६ एप्रिलपर्यंत करता येणार अर्ज

Merchant Abducted : दीड कोटींच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याचे अपहरण; अपहृत व्यापाऱ्याची सुखरूप सुटका, पाच आरोपींना अटक

Solapur News : सावळेश्वर टोलनाका पुन्हा वादात! चालकाला रक्तबंबाळ करेपर्यंत मारले; पोलिसांनी आवळल्या मुसक्या.

Pune University : पुणे विद्यापीठाला अखेर मिळाले कुलसचिव; छुप्या पद्धतीने नियुक्ती केल्याचा संघटनांचा आरोप

Pune News : विना अडथळा खोदकाम करता येणार; पाइपलाइन गॅस व सीएनजी वितरणासाठी केंद्र सरकारचा नवा आदेश

SCROLL FOR NEXT