success story of two doctors Dr Sambhaji Chavan and Dr Krishna Satpute in dairy industry
success story of two doctors Dr Sambhaji Chavan and Dr Krishna Satpute in dairy industry sakal
मराठवाडा

Success Story डॉक्टर मित्र रमले दूध उद्योगात...

सकाळ वृत्तसेवा

उस्मानाबाद : डॉक्टर असूनही उद्योगामध्ये एक वेगळा आदर्श निर्माण करू शकतो, यातून परिसरातील शेतकरी- कष्टकऱ्यांच्या पदरात चार पैसे मिळवून देता येतात, हे डॉ. संभाजी चव्हाण आणि डॉ. कृष्णा सातपुते यांनी दाखवून दिले आहे. गिरवली (ता. भूम) येथील हे बालमित्र आता दूध उद्योगामध्ये यशस्वी झाले आहेत. त्यांनी बनविलेले दुग्धजन्य पदार्थ पुणे, नाशिक, नगरसह परराज्यातही पोचत आहेत.

डॉ. संभाजी चव्हाण बीएएमएस असून ईट (ता. भूम) येथे वैद्यकीय सेवा देतात. त्यांचे सहकारी डॉ. कृष्णा सातपुते पशुवैद्यकीय अधिकारी आहेत. या दोघांच्या प्रयत्नातून २०१६ मध्ये ‘ओयासिस’नावाचे एक छोटेसे रोपटे लावले. भूम तालुका हा दुष्काळी म्हणून ओळखला जातो. बालाघाट डोंगररांगामध्ये वसलेल्या तालुक्यात जनावरांसाठी डोंगरदऱ्यात चारा उपलब्ध असल्याने इथे पशुधनही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे दुधाची मोठी उपलब्धता आहे. मात्र पशुपालकांना दुधाला चांगला दर मिळत नव्हता. त्यासाठी डॉ. चव्हाण यांनी शेतकऱ्यांसाठी पर्याय शोधण्याचा प्रयत्न केला. स्वतः दूध संकलन करून त्याद्वारे विविध पदार्थ तयार करण्याचा उद्योग त्यांनी उभा केला. यातून त्यांचा खवा, तूप, दूध, पनीर, ताक, लस्सी आदी पदार्थ तयार करायला सुरवात केली. ‘ओएसिस’ नावाने स्वतःचा ब्रँड तयार करून पुणे, नगर, नाशिक, औरंगाबाद, सातारा आदी शहरांत विक्री करीत आहेत. दर्जेदार पदार्थ असल्याने चांगली मागणी आहे. खव्याला परराज्यातूनही मागणी वाढत आहे.

विजेचा प्रश्न सुटावा

ग्रामीण भागात उद्योग सुरू करण्यासाठी प्रथम २४ तास वीज उपलब्ध असायला हवी. मात्र या भागात वीजपुरवठा बेभरवशाचा असल्याने अडचणी येत आहेत. त्यासाठी मोठ्या किमतीचे जनरेटर खरेदी करावे लागले. वीज केल्यानंतर दररोज हजारोंचे इंधन जाळावे लागले. ही बाब आर्थिक तोट्यात जाते. शासनाने अशा उद्योगांना नियमित वीजपुरठा देण्यासाठी प्रयत्न करावा, अशी अपेक्षा डॉ. चव्हाण व्यक्त करतात.

तीन लाख ते दीड कोटी

या व्यवसायला २०१६ मध्ये सुरुवात केली. विशेष म्हणजे यातील बहुतांश यंत्रणा त्यांनी जुनी खरेदी केली. भंगारातील साहित्याला त्यांनी स्वतःच्या कल्पकतेची जोड दिली. त्यामुळे यांत्रिकीकरणावर जास्त खर्च झाला नाही. अगदी तीन लाखांपासून उद्योगाला सुरवात केली. आता दीड कोटीपर्यंतची यंत्रणा राबविली असून दररोज अडीच हजार लिटर दुधाचे संकलन होते. त्यापासून विविध पदार्थ तयार होत आहेत. यातून परिसरातील १५ जणांना रोजगारही मिळाला असून सुमारे एक हजार २०० शेतकरी उद्योगाशी जोडले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Chrome Errors: गुगल क्रोम युजर्सना सरकारचा इशारा, नुकसान टाळण्यासाठी लगेचच करा 'हे' बदल

Sharad Pawar: "मेहनत घेण्याची क्षमता आणि चिकाटी..."; शरद पवारांसाठी हेमंत ढोमेचं ट्वीट

California Bridge : कुठेच न पोहोचणारा 11 बिलियन डॉलरचा पूल! कॅलिफोर्नियतला ब्रिज झाला चेष्टेचा विषय

Latest Marathi News Update : पंतप्रधान मोदी प्रचारसभेसाठी ओडिशामध्ये

Warren Buffett: गुंतवणुकीसाठी अमेरिका ही पहिली पसंती; भारताबाबत काय म्हणाले वॉरन बफे?

SCROLL FOR NEXT