Kolhapur Crime
esakal
कोल्हापूर
Kolhapur Crime : इचलकरंजीच्या तरूणाचे अपहरण करून निर्घृण खून; कर्नाटक -महाराष्ट्र सीमेवरील ओढ्यात फेकला मृतदेह, खुनाचं कारण काय?
Ichalkaranji Youth Killed : इचलकरंजी तरुणाचा खून प्रकरण उघडकीस; अपहरणानंतर कॉलेजजवळील ओढ्यात मृतदेह टाकला. कर्नाटक–महाराष्ट्र सीमेवरील या घटनेने परिसरात खळबळ, खुनाचे कारण अद्याप स्पष्ट नाही.
Ichalkaranji Crime News : (ऋषीकेश राऊत) मोटरसायकल रिपेअरचे कारण सांगत तरुणाचे अपहरण करून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अपहृत सुहास सतिश थोरात (वय 19, रा. भोनेमाळ, इचलकरंजी) याचा मृतदेह कर्नाटक–महाराष्ट्र सीमेवरील देवचंद कॉलेजच्या पाठीमागील ओढ्यात आढळून आला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून तीन संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

