Osmanabad Osmanabad
मराठवाडा

उस्मानाबादेत पोस्ट म्युकरची दुर्मिळ शस्त्रक्रिया; जिल्हा रुग्णालयाच्या टीमला यश

पोस्ट म्युकरची ही अत्यंत वेगळी व दुर्मिळ केस असल्याने ही शस्त्रक्रिया अधिक कठीण होती

तानाजी जाधवर

उस्मानाबाद: mucormycosis operation in Osmanabad: जिल्हा रुग्णालयात एकाच रुग्णावर दोन महिन्यांत दोनदा शस्त्रक्रिया करून रुग्णाचे प्राण वाचविण्यात आले आहेत. पोस्ट म्युकरची ही अत्यंत वेगळी व दुर्मिळ केस असल्याने ही शस्त्रक्रिया अधिक कठीण होती. असे असतानाही जिल्हा रुग्णालयाच्या टीमने हे दिव्य पार पाडले आहे. यामुळे सामान्य रुग्णाचे प्राण तर वाचलेच आहे. शिवाय या शस्त्रक्रियावर होणारा लाखो रुपयांचा खर्च देखील वाचविण्यात यश आले आहे. दोन महिन्यांपूर्वी जिल्ह्यातील एका ३५ वर्षीय पुरुषाच्या नाका भोवतालचे सायनस मधील म्युकर मायकॉसिसची शस्त्रक्रिया झाली होती. त्याला २१ दिवस एम्फोटेरिसीन बी दिले गेले. परंतु, दोन महिन्यांनी त्याला टाळूवर म्युकरची लक्षणे दिसून आली.

दरम्यान, टाळूची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. रुग्णाची आर्थिक परिस्थिती बिकट होती. त्यामुळे टाळूची शस्त्रक्रिया करणारे खासगी डॉ. कृष्णा देशमुख (एमडीएस) व डॉ. अजय अंधारे (एमडीएस) यांना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. डी.के. पाटील व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन देशमुख यांनी विनंती केली. यानंतर डॉ. देशमुख, डॉ. अंधारे या दोघांनी मोफत शस्त्रक्रिया करण्याचा शब्द दिला. परंतु, रुग्णाचे तोंड खूपच कमी उघडत असल्याने भुल देण्यास अडथळा येत होता. यानंतर जिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनाने डॉ. प्रवीण डुमने यांना विनंती करून त्यांच्या खासगी रुग्णालयात उपलब्ध असणारे ब्रोनस्कोपी मशिन घेऊन येण्याची तयारी दर्शवली.

जिल्हा रुग्णालयामध्ये डॉ. डुमने यांनी मशिनद्वारे इनट्यूबिट करून दिले. डॉ. सतीश आदठराव, डॉ. श्रीकांत बलवंडे यांनी रुग्णाला भूल दिली. यानंतर डॉ. कृष्णा देशमुख, डॉ. अजय अंधारे यांनी शस्त्रक्रिया केली. खासगी डॉक्टरांनी विनामोबदला रुग्णाची सहाय्यता केल्याने सदरील रुग्णाचा दोन ते अडीच लाख रुपयांचा खर्च वाचविला आहे. आता खासगी डॉक्टरांसह जिल्हा रुग्णालय प्रशासनाचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी अभिनंदन केले आहे.

रुग्णाला आर्थिक आधार
एका शस्त्रक्रियेसाठी खासगी रुग्णालयामध्ये किमान दोन ते अडीच लाख रुपयांचा खर्च येतो. शिवाय रुग्णाच्या स्थितीनुसार एम्फोटेरिसीन बीची किमान साठ ते शंभर इंजेक्शन द्यावी लागतात. यासाठी साधारण दिवसाला ४० हजारांची ही इंजेक्शन होतात. पहिल्यांदा शस्त्रक्रिया झाल्यानंतर सदरील रुग्णाने २१ दिवस इंजेक्शन देखील घेतली होती. आता नव्याने शस्त्रक्रिया झाल्यानंतर पुन्हा इंजेक्शन सुरू केल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले. साधारण एका रुग्णाचा खर्च सात लाख रुपयांपर्यंत जातो. परंतु, या मोफत शस्त्रक्रियेमुळे रुग्णाला मोठा आर्थिक आधार मिळाला आहे.

एका बाजूला शस्त्रक्रिया करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची आवश्यकता होती. खासगी डॉक्टरांना मोफत ही शस्त्रक्रिया करण्याची विनंती केली. शिवाय टाळूची शस्त्रक्रिया असल्याने, श्वसन नलिकेच्या ठिकाणी ट्यूब टाकण्याची आवश्यकता होती. त्याचीही साधनसामुग्री आपल्याकडे उपलब्ध नव्हती. ती देखील उपलब्ध करून दिल्यानंतर ही शस्त्रक्रिया पूर्ण झाली.
-डॉ. सचिन देशमुख, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Toll Collection : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अपूर्ण, टोल वसुली सुरू; नितीन गडकरींच्या आवाहनाला केराची टोपली

लाईव्ह सामन्यात रवी शास्त्रींची मोठी चूक! नाणेफेकीच्या वेळी शुभमन गिलला काय बोलले?

Child Rescue Operation: पंजाबमध्ये कूपनलिकेतून नऊ तासांनंतर मुलगा बाहेर; घराबाहेर खेळताना पडला होता खड्ड्यात, होशियारपूरमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन!

Rajdhani Express धावत्या राजधानी एक्सप्रेसमध्ये आगीचा भडका, एसी कोच जळून खाक

Amravati : अतिक्रमणातील चहाटपऱ्या काढल्याचा राग, पठ्ठ्या सिलिंडर घेऊन थेट पाण्याच्या टाकीवर चढला अन ....

SCROLL FOR NEXT