file photo 
मराठवाडा

कोरोनाने मृत झालेल्यांच्या अंत्यसंस्कारासाठी नगरसेवकाचा असाही पुढाकार  

गणेश पांडे

परभणीः  कोरोनाने एकीकडे जगासह देशात, राज्यात थैमान घातले असून त्यामुळे नात्यातील बंध देखील सैल पडू लागले आहेत. तर दुसरीकडे समाजहित, सामाजिक भावनेतून येथील नगरसेवक चंद्रकांत शिंदे हे ज्यांचे नातलग जवळ नाहीत अशा व्यक्तीच्या अंत्यसंस्कारात पीपीई कीट परिधान करून सहभागी होत आहेत.

शहरासह जिल्ह्यात देखील कोरोनाने उच्छाद मांडलेला असून पाच हजार जणांना लागन झाली. त्यातही दोनशेवर अधिक जणांचा यामध्ये मृत्यू झाला. अनेक कुटूंब उध्द्वस्थ झाली असून अनेकांना पोरके केले आहे. कोरोनावर मात करून आलेल्या आई-बाबा, पती-पत्नी, मुला-मुलींचे एकीकडे जोरदार स्वागत केले जाते. आईसाठी मुलांचा टाहो ही मन हेलावून सोडणारा ठरतो. अनेक जणांना दुरुनच पाहावे लागते. तर अनेकांच्या पदरी एकटे जाण्याची वेळ येते. तेव्हा प्रशासनालाच अंत्यसंस्काराचे सोपस्कर पूर्ण करावे लागतात.

हेही वाचाजागतिक पर्यटन दिन - श्री साईंबाबांच्या कर्मभूमीप्रमाणेच जन्मभूमी येतेय नावारूपास 

महापालिकेकडून अंत्यसंस्कार

शहरात मृत्यू झालेल्या कोरोना बाधित व्यक्तीवर महापालिकेच्या स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांकडून अंत्यसंस्कार केले जातात. प्रत्येक वेळेस सदरील व्यक्तीच्या नातेवाईकांना कळवले जाते. बहुतांश जण येतात. परंतू, काही येत नाहीत. अशा वेळी पालिकेचे कर्मचारीच अंत्यसंस्कार करतात.

नगरसेवकाने केली इच्छा व्यक्त

महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते नगरसेवक चंद्रकांत शिंदे यांनी स्वतःहून एखाद्या व्यक्तीचे नातेवाईक नसतील तर आपणास अंत्यसंस्कारासाठी बोलावले जावे अशी कल्पना आयुक्तांसह कर्मचाऱ्यांना दिली. मग ते कर्मचारी देखील त्यांना माहिती देतात. रात्र असो की दिवस श्री.शिंदे हे स्मशानभूमीत जातात, अंगावर पीपीई किट चढवतात, तेथील पालिकेच्या कर्मचाऱ्यांना मृतदेह ठेवण्यासाठी सहकार्य करतात तर कधी भडाग्नी देखील देतात.  

येथे क्लिक करा  जागतिक पर्यटन दिन - औंढा नागनाथ भाविकांसह पर्यटकांचेही आकर्षण 

समाजसेवा घडावी यासाठी प्रयत्न

अंत्यसंस्कारास जाणे हे देखील एक पुण्याचे काम आहे. आपल्या हातून समाजसेवा घडावी, सर्वसामान्यांच्या मनातील भीती कमी व्हावी या उद्देशाने आपण अंत्यसंस्कारात सहभागी होत आहेत. आत्तापर्यंत तीन अंत्यसंस्कार केले. ज्यांना कुणी नाही, त्यांच्यासाठी मला बोलवा, असे मी पालिकेच्या कर्मचाऱ्यांना सांगून टाकले आहे. गरज असेल तेव्हा ते बोलावतात व आपणही जातो.
- चंद्रकांत शिंदे, गटनेते शिवसेना, मनपा, परभणी

संपादन ः राजन मंगरुळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा Ee Sala Cup Namde! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश; गुजरात टायटन्सचा लाजीरवाणा पराभव

BJP Government: भाजप सरकार देणार पाच रुपयांमध्ये मासे-भात भोजन; महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेची घोषणा

Sholay Style Agitation : पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइलने आंदोलन; जलजीवन योजनेचे पाणी घरापर्यंत पोहोचत नसल्याने केला निषेध

Ambad Rajasthani Women: अंबडमध्ये राजस्थानी महिला मंडळाचा ‘धोंडा रो आगमन’ सोहळा; दीडशे लेकींचा पारंपरिक धोंडे जेवण, आहेर व भेटवस्तूंनी सन्मान

Sakoli Murder Case: गडकुंभली तलाव हत्याकांड उघड: निखिल कांबळे खूनप्रकरणी आरोपी जेरबंद, तलावातून धारदार चाकू व दगड जप्त

SCROLL FOR NEXT