Latur  sakal
मराठवाडा

Latur : लातूरमध्ये भाजपला पुन्हा उभारी देऊ;सुधाकर शृंगारे, पराभवामुळे खचून न जाता कार्यरत राहणार

गेली पाच वर्षे जिल्ह्याची सेवा करण्याची संधी लातूरकरांनी दिली. भरभरून प्रेम दिले. याचा मला आनंद आहे. याबद्दल मी लातूरकरांचे मनापासून आभार मानतो, अशी भावना माजी खासदार सुधाकर शृंगारे यांनी व्यक्त केली. खचून न जाता लातूर जिल्ह्यात भाजपचे आमदार कसे निवडून येतील, याकडे आता आपण लक्ष देऊ, असेही ते म्हणाले.

सकाळ वृत्तसेवा

लातूर : गेली पाच वर्षे जिल्ह्याची सेवा करण्याची संधी लातूरकरांनी दिली. भरभरून प्रेम दिले. याचा मला आनंद आहे. याबद्दल मी लातूरकरांचे मनापासून आभार मानतो, अशी भावना माजी खासदार सुधाकर शृंगारे यांनी व्यक्त केली. खचून न जाता लातूर जिल्ह्यात भाजपचे आमदार कसे निवडून येतील, याकडे आता आपण लक्ष देऊ, असेही ते म्हणाले.

लोकसभेच्या लातूर मतदारसंघाचा निकाल जाहीर झाल्यानंतर सुधाकर शृंगारे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेसमोर येऊन निकालाबाबत प्रथमच आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, निकाल जाहीर झाल्यानंतर मला जनतेसमोर यायला काहीसा वेळ लागला. अनेक कार्यकर्ते नाराज आहेत, याची जाणीव मला आहे. मलाही सावरण्यासाठी थोडा वेळ लागला, हे खरे आहे.

बरीच कामे केली

शृंगारे म्हणाले, ‘लातुरात रेल्वे कोच फॅक्टरी आणली. त्याचे उद्‍घाटन झाले. ‘जलजीवन’च्या माध्यमातून चार हजार कोटींची कामे झाली. घरकुलाची ३७ हजार कामे झाली. सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल विकसित केले. कोरोनाकाळात ऑक्सिजन प्लांट मंजूर करून आणले. रेल्वेची सुविधा वाढविली. पीटलाईन मंजूर करून आणली.

दिव्यांगबांधवांना मोठ्या प्रमाणात साहित्य वाटप केले. अशा विविध माध्यमांतून जनतेची सेवा करीत राहिलो. पराभवामुळे न खचता लातूर जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाला पुन्हा एकदा उभारी द्यायची आहे. त्यासाठी नव्या उमेदीने प्रयत्न करू.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC ODI World Cup 2027 India Fixture: रोहित शर्मा, विराट कोहलीचा शेवटचा वर्ल्ड कप! पण, भारताचे सामने किती वाजता सुरू होणार? कुठे Free पाहता येणार?

Pune Teamperature : ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उकाड्याचे चटके; तापमान सरासरीपेक्षा एक-दोन अंशांनी अधिक राहण्याचा अंदाज

Dapoli News : दाभोळजवळ शिकारीदरम्यान बंदुकीचा मिसफायर; एकाचा मृत्यू, एक जखमी

Pune News : पुणे महापालिका आयुक्तांचा यूटर्न; ५०० वॉर्डनच्या निविदेला स्थगिती

Ghansangavi Crime : जिरडगाव येथील हॉटेलमालकाचा खून सख्ख्या भावानेच जमिनीच्या वादातून केल्याचे निष्पन्न; आरोपी भावासह दोन जण जेरबंद

SCROLL FOR NEXT