file photo
file photo 
मराठवाडा

ऊसाअभावी घटणार साखर उत्पादन

कृष्णा जोमेगावकर

नांदेड : नांदेड विभागात येणाऱ्या चार जिल्ह्यांत उसाचे क्षेत्र केवळ ८१ हजार हेक्टर असल्यामुळे यंदा साखरेचे उत्पादन मागच्या तुलनेत निम्यावर येण्याची शक्यता आहे. यंदा विभागात १२ खासगी, तर पाच सहकारी अशा एकूण १७ साखर कारखान्यांना गाळपाचा परवाना मिळाल्याची नांदेड येथील विभागीय सहसंचालक (साखर) बी. एल. वांगे यांनी दिली.

नांदेड विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड व लातूर जिल्ह्यातील खासगी व सहकारी साखर कारखाने आगामी गाळप हंगामासाठी सज्ज झाले आहेत. विभागातील १२ खासगी, तर पाच सहकारी अशा एकूण १७ साखर कारखान्यांनी राज्याच्या साखर आयुक्तांकडे गाळप परवानासाठी आॅनलाइन अर्ज सादर केले आहेत. यात सर्वाधिक १२ खासगी साखर कारखान्यांचा समावेश आहे. तर पाच सहकारी साखर कारखान्यांनीही अर्ज केला आहे. या कारखान्यांना गाळपासाठी परवाना मिळाला आहे.

विभागात यंदा ८१ हजार ६४२ हेक्टरवरील ऊस गाळपासाठी उपलब्ध होईल, असे कृषी विभाग व साखर कारखान्यांनी सामायिक सभेत निश्‍चित केले आहेत.
मागील वर्षाच्या तुलनेत यंदा साखरेचे उत्पादन निम्यापेक्षाही कमी, म्हणजे ४० लाख क्विंटल होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

गेल्या हंगामात ८८ लाख टन उसाचे गाळप
मागील हंगामात नांदेड विभागात २४ कारखान्यांनी गाळप सुरू केले होते. ता. २७ ऑक्टोबर २०१८ रोजी लातूर जिल्ह्यातील विकास सहकारी साखर कारखान्याच्या गाळपाने हंगाम सुरू झाला होता. तर शेवट ता. १२ एप्रिल २०१९ रोजी लातूर जिल्ह्यातीलच रेणा सहकारी साखर कारखान्याचा पट्टा पडल्याने झाला होता. या हंगामात विभागातील २४ कारखान्यांत ८९ लाख ६२ हजार ३३३ टन उसाचे गाळप झाले होते. तर साखरेचे उत्पादन ८८ लाख २७ हजार २०२ क्विंटल झाले होते.

वाचुन तर बघा....फुलशेतीने दिले जगणाचे बळ.

विभागात ऊस लागवड घटली


नांदेड विभागात पावसाअभावी उसाची लागवड घटली होती. यामुळे आगामी गाळप हंगामासाठी चार जिल्ह्यातून ८१ हजार ६४२ टन उपलब्ध होणार आहे. यात नांदेड जिल्ह्यात ३० हजार हेक्टर, हिंगोली सहा हजार १२१ हेक्टर, परभणी १५ हजार ७५९ हेक्टर, तर लातूर जिल्ह्यात २९ हजार ७६२ हेक्टरवर उसाची लागवड झाली आहे. मागील हंगामासाठी विभागातून एक लाख ४२ हजार ५०३ हेक्टरवरील उसाची उपलब्धता झाली होती. यात नांदेड २३ हजार ३०३ हेक्टर, हिंगाेली ११ हजार दोनशे हेक्टर, परभणी ४५ हजार सातशे, तर लातूर ६२ हजार तीनशे हेक्टरवरील उसाची उपलब्धता झाली होती. यंदा मागच्या तुलनेत जवळपास ६१ हजार हेक्टर उसाची कमतरता भासणार आहे.

आगामी काळात सुरू होणारे कारखाने


नांदेड विभागात पूर्वी पाच जिल्ह्यांचा समावेश होता. परंतु, मागील वर्षी युती शासनाने सोलापूर जिल्ह्यात साखर सहसंचालक कार्यालय नव्याने सुरू केले. या विभागात नांदेड विभागात येणाऱ्या उस्मानाबाद जिल्ह्याचा समावेश केला. यामुळे नांदेड विभागात आता नांदेड, परभणी, हिंगोली व लातूर जिल्ह्यांच्या समावेश होतो. या जिल्ह्यांतील १७ कारखान्यांना गाळप परवाना मिळाला आहे. यात नांदेड जिल्ह्यातील देगाव (ता. अर्धापूर) येथील भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना युनिट क्रमांक एक, हडसणी (ता. हदगाव) येथील भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना युनिट क्रमांक चार या दोन सहकारी साखर कारखान्यासह कुंटूर (ता. नायगाव) येथील कुंटूरकर शुगर व लोहा तालुक्यातील शेवडी येथील व्यंकटेश्वरा शुगर या दोन खासगी कारखान्यांचा समावेश आहे. लातूर जिल्ह्यातील सिद्धी शुगर बालाघाट, साईबाबा, टेन्टीवन शुगर व जागृती या चार खासगी कारखान्यांचा समावेश आहे. परभणी जिल्ह्यातील रत्नप्रभा रेणुका, त्रिधारा नृसिंह, योगेश्वरी, बळिराजा व महाराष्ट्र शेतकरी शुगर सायखेडा या पाच खासगी कारखान्यांचा समावेश आहे. तसेच हिंगोली जिल्ह्यातील पूर्णा सहकारी वसमत, डोंगरकडा (ता. कळमनुरी) येथील भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना युनिट क्रमांक दोन, टोकाई हे तीन सहकारी साखर कारखाने, तर शिरूर येथील खासगी साखर कारखान्याचा समावेश आहे. जिल्ह्यात यंदा डिसेंबर महिना उजडूनही आजपर्यंत एकाही कारखान्याचे गाळप सुरू झाले नाही. मागील वर्षी ता. दहा ऑक्टोबरला हंगाम सुरू झाला होता, हे विशेष.

हेही वाचा...लसणावर चोरट्यांचा हात साफ

गाळप सुरू होणारे जिल्हानिहाय कारखाने


जिल्हा......सहकारी.....खासगी.....एकूण
नांदेड.........दोन.........दोन.........चार
परभणी.......शून्य.........पाच........पाच
हिंगोली.......तीन.........एक..........चार
लातूर.........शून्य........चार..........नऊ
एकूण.........१२..........पाच.........१७

नांदेड विभागात यंदा १७ कारखान्यांना गाळप परवाना मिळाला आहे. विभागात ८१ हजार हेक्टरवर उसाची लागवड झाल्याने साखरेचे उत्पादन मागच्या तुलनेत कमी होईल.
बी. एल. वांगे,
प्रादेशिक सहसंचालक (साखर), नांदेड.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT