प्रतीकात्मक छायाचित्र.
प्रतीकात्मक छायाचित्र. 
मराठवाडा

पोलिस ठाण्याच्या इमारतीवरून उडी मारण्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद - घरात वाद झाला. या भांडणाचा राग डोक्‍यात ठेवून तो पोलिस ठाण्यात आला. तिथेही गोंधळच घातला. मानसिकरीत्या अस्वस्थ असलेल्या त्याने मग स्वत:च त्रागा केला आणि पोलिसांची नजर चुकवून तो ठाण्याच्या इमारतीवर उडी मारण्यासाठी चढला, वेळीच ही बाब पोलिसांच्या लक्षात आली अन्‌ त्याने उडी मारण्याच्या आतच पोलिसांनी त्याला पकडून खाली आणले. रविवारी (ता. 15) वेदांतनगर पोलिस ठाण्यात अर्धा तास चाललेल्या या प्रकारामुळे पोलिसांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. 

पोलिस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, बनेवाडीतील विठ्ठल नामक व्यक्तीवर यापूर्वी हद्दपारीची कारवाई करण्यात आली होती. तो मानसिकरीत्या 
तंदुरुस्त नाही. बनेवाडीतही तो धिंगाणा घालतो. किरकोळ कारणांवरून त्याचा वाद होतो. त्याचा उपद्‌व्याप थांबविण्यासाठी समज आणि मारहाणही केली जाते. याबाबत तो अनेकदा तक्रार देण्यासाठी वेदांतनगर ठाण्यात आला आहे. त्याच्या स्वभावाचा ठाण्यातील कर्मचाऱ्यांना अंदाज असून त्याच्या गोंधळाला पोलिसही अनेकदा वैतागतात. रविवारी कुटुंबीयांशी वाद
झाल्यानंतर तो त्यांच्याविरुद्ध तक्रार देण्यासाठी ठाण्यात आला. नेहमीचेच प्रकरण असल्याने पोलिसांनी त्याच्याकडे विशेष लक्ष दिले नाही. बराच वेळ ठाण्यात थांबल्यानंतर तो अचानक ठाण्याच्या इमारतीवर गेला. समोरील दर्शनी भागात येऊन त्याने उडी मारण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार रस्त्यावर उभ्या काही लोकांना दिसला. त्यांनी पोलिसांना त्याची माहिती दिली.
त्यानंतर पोलिसांनी इमारतीवर धाव घेतली. तोपर्यंत तो कठड्यावर उभा राहत होता. त्यातील एकाने पटकन विठ्ठलला पकडले; पण तो निसटताच अन्य कर्मचाऱ्यांनी त्याला घट्ट पकडून नंतर सुखरूप खाली आणले. या सर्व प्रकाराने पोलिसांना मात्र मनस्ताप झाला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

Rinku Singh T20 WC 2024 : रोहितला जास्त पर्याय... रिंकू सिंहला वगळण्याबाबत अजित आगरकर काय म्हणाला?

Water On Moon : चंद्रावर अपेक्षेपेक्षा जास्त पाण्याचे साठे.... इस्त्रोने केला मोठा खुलासा

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आसामच्या काही भागांमध्ये पूर

SCROLL FOR NEXT