file photo
file photo 
मराठवाडा

तरुणाची आत्महत्या; तहसीलदाराना शिवीगाळ : कुठे ते वाचा

सकाळ वृत्तसेवा

सेलू  (जि.परभणी) : वालूर (ता.सेलू, जि.परभणी) येथील शेतकरी कुटुंबातील ज्ञानेश्वर मुंजा भुजबळ (वय २६) याने शनिवारी (ता.९) दुपारी दीड ते दोनच्या सुमारास स्वतःच्या शेतातील लिंबाचा झाडास दोरीचा सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली.

मृताचे चुलते रंगनाथ नाथा भुजबळ यांच्या खबरीवरुन पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सेलू ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. वालूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ.प्रकाश वाठोरे यांनी उत्तरीय तपासणी केली. घरातील किरकोळ वादातून ज्ञानेश्वर दारुच्या नशेत टोकाचे पाऊल उचलले असल्याची माहिती मिळाली असून रात्री उशिरा त्याच्यावर वालुर-बोरी रस्त्यावरील वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. पुढील तपास वालूर पोलिस दूरक्षेत्र कार्यालयाचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक एस. पी. चौरे करीत आहेत.

हेही वाचा ...


तहसीलदाराना शिवीगाळ, दोघांविरोधात गुन्हा

मानवत (जि.परभणी) : अवैध विनापरवाना मुरुमाची चोरटी वाहतूक करणारे वाहन रोखल्याने तहसीलदाराना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून दमदाटी केल्याची घटना वझुर ( खु.) (ता.मानवत, जि.परभणी) येथे शुक्रवारी (ता.आठ) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी शुक्रवारी रात्री उशीरा दोघांजणा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

कुंभारी (ता.मानवत) येथे अवैध वाळुसाठा केल्याची माहिती तहसील प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार वाळू साठा जप्त करण्यासाठी शुक्रवारी (ता.आठ) तहसीलदार डी. डी. फुफाटे, मंडळ अधिकारी योगेंद्र नांदापूरकर, तलाठी बाबासाहेब गायकवाड, चालक सुभाष कच्छवे हे शासकीय वाहनांने कुंभारी येथे जात होते. तहसीलदार डी. डी. फुफाटे यांना वझुर (ता.मानवत) येथे मुरुमाची वाहतूक करणारे एक ट्रॅक्टर आढळले. ट्रॅक्टर चालकांला थांबण्याची सूचना केली असता सदर ट्रॅक्टर चालकांने वाहन वेगाने पळविले. या नंतर पथकाने वाहनाचा पाठलाग केला असता आरोपीनी मुरुमाने भरलेले वाहन रिकामे करून पळवून घेऊन गेले. 

वाहनांचा आदळला दरवाजा  
आरोपी वाहनचालक अशोक आत्माराम शिंदे, रमेश आत्माराम शिंदे (रा.वझुर खु.) यांनी शासकीय वाहन अडवून तहसीलदार फुफाटे यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून शासकीय वाहनांच्या दरवाजा आदळला. या प्रकरणी तलाठी रामप्रसाद कोल्हे यांच्या फिर्यादीवरुन शुक्रवारी (ता.आठ) रात्री पाऊणे दहा वाजण्याच्या सुमारास आरोपी अशोक आत्माराम शिंदे, रमेश आत्माराम शिंदे यांच्या विरोधात शासकीय कामात हस्तक्षेप केल्याप्रकरणी विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक नागनाथ तुकडे हे करीत आहेत.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT