Uddhav Thackeray And Sumant Ruikar esakal
मराठवाडा

मुख्यमंत्री ठाकरेंच्या आरोग्यासाठी 'तिरुपती'ला निघालेल्या सुमंत रुईकरांचे निधन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया झाली असून त्यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी ते मित्रासह तिरुपती बालाजीला पायी निघाले होते.

सकाळ डिजिटल टीम

बीड : बीडमधील एका सच्च्या शिवसैनिकाचा काळजाला चटका लावणारा शेवट झाला आहे. त्या शिवसैनिकाचे नाव सुमंत मोहनराव रुईकर. सुमंत ( वय ४८) यांचे शनिवारी (ता.२५) निधन झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर शस्त्रक्रिया झाली असून त्यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी ते मित्रासह तिरुपतीस पायी निघाले होते. या दरम्यान तीन दिवस (Beed) त्यांना ताप आला होता. त्यामुळे (Sumant Ruikar) त्यांना रायचूर (कर्नाटक) येथील हाॅस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. (Sumant Ruikar Died Who Prayed For Chief Minister Uddhav Thackeray)

येथे शनिवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. सुमंत रुईकर यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, वडील, भाऊ असा परिवार आहे. यापूर्वीही वर्ष २०१९ मध्ये उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी बीड ते तिरुपती बालाजी असा पायी यात्रा त्यांनी केली होती. उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाल्यावर सुमंत रुईकर यांच्या निष्ठेचे कौतुक करुन त्यांचा सत्कार केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिकेतील छेडछाड आता गुन्हा ठरणार

SCROLL FOR NEXT