jalna sakal
मराठवाडा

Jalna News : नूतन पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी घेतला पदभार

मागील पाच महिन्यांपासून जालना प्रभारी पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले शैलेश बलकवडे यांच्याकडून रविवारी (ता.चार) नूतन पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी पदभार स्वीकारला.

सकाळ वृत्तसेवा

जालना : मागील पाच महिन्यांपासून जालना प्रभारी पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले शैलेश बलकवडे यांच्याकडून रविवारी (ता.चार) नूतन पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी पदभार स्वीकारला. यावेळी जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था आणि सामान्य नागरिक केंद्रबिंदू ठेवून कामकाज केले जाईल असे नूतन पोलिस अधीक्षक श्री. बन्सल यांनी म्हटले.

मागील पाच महिन्यांपासून प्रभारी पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी मराठा आरक्षण आंदोलन आणि ओबीसी समाजाचे आंदोलन यशस्वीरीत्या हाताळत जिल्ह्यातील कायदा, सुव्यवस्था अबाधित ठेवला. दरम्यान काही दिवसांपूर्वी गृह विभागाकडून पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यात जालना पोलिस अधीक्षक म्हणून बृहन्मुंबई आयुक्त अजयकुमार बन्सल यांची जालना येथे बदली करण्यात आली. श्री.बन्सल यांनी रविवारी (ता. चार) प्रभारी पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याकडून पदभार स्वीकारला.

२०१४ च्या बॅचचेआयपीएस

नूतन पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल हे २०१४ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी यवतमाळ येथे डीवायएसपी, गडचिरोली येथे अपर पोलिस अधीक्षक, सातारा पोलिस अधीक्षक आणि बृहन्मुंबई आयुक्तपदी काम केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या दराबाबत मोठी अपडेट! आज तुमच्या शहरात किती रुपयांना मिळतंय 22 कॅरेट सोनं?

ACB Action in Kadegaon : कडेगावात लाचलुचपतचा मोठा दणका! निकाल बाजूने लावण्यासाठी सहा हजारांची लाच मागणारा मंडल अधिकारी जाळ्यात

'काजोलसारखी दिसणारी दुसरी बाई माझ्यासमोर उभी केली आणि...' देवेंद्र गायकवाडने सांगितला 'तान्हाजी'मधील किस्सा, म्हणाला...

Latest Marathi News Live Update : रुपाली चाकणकरांच्या कोट्यावधींच्या हॉटेल उद्घाटनात बड्या नेत्याची हजेरी

Sandeep Deshpande : "मराठी सण गुजरात्यांच्या हातात, याला जबाबदार लालबागचा राजा मंडळ", संदीप देशपांडेंची टीका

SCROLL FOR NEXT