मानवत शिवसेना मदत कार्य 
मराठवाडा

मानवतमधील कोरोना रुग्णांना शिवसेनेच्या मदत केंद्राचा आधार

तालुक्यात मागील दोन महिन्यात कोरोना रुग्ण संख्येत मोठी वाढ झाली. यामुळे प्रशासनावर मोठ्या ताण आला. अचूक माहिती व मदत मिळत नसल्यामुळे सामान्य नागरिकांचा गोंधळ होत होता.

प्रा. किशन बारहाते

मानवत ( जिल्हा परभणी ) : शहरात शिवसेनेच्या वतीने सुरु करण्यात आलेले मदत केंद्र सामान्य नागरिकांचा आधार बनले आहे. या केंद्राच्या माध्यमातून कोरोना संकटात नागरिकांसाठी विविध प्रकारची मदत केली जात आहे.

तालुक्यात मागील दोन महिन्यात कोरोना रुग्ण संख्येत मोठी वाढ झाली. यामुळे प्रशासनावर मोठ्या ताण आला. अचूक माहिती व मदत मिळत नसल्यामुळे सामान्य नागरिकांचा गोंधळ होत होता. ही बाब लक्षात घेऊन शिवसेनेचे माजी शहरप्रमुख अनिल जाधव यांनी मदत केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला.ग्रामीण रुग्णालयासमोरील स्वतः च्या जागेत त्यांनी मदत केंद्र उभारले. या केंद्रावर रुग्णांना मदत करण्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी उपलब्ध असतात.

हेही वाचा -  ऑक्सिजनअभावी सुरू असलेले उद्योग बंद पडत असल्याचे ‘सकाळ’ने निदर्शनास आणले होते.

ग्रामीण भागात रुग्णांना केअर सेंटरमध्ये दाखल करुन घेण्यासाठी रुग्णवाहिका पाठविणे. केअर सेंटरमध्ये दाखल करुन घेण्यासाठी मदत करणे, रुग्णांच्या कुटूंबाने पाठविलेल्या वस्तू रुग्णांना देणे, बरे झालेल्या घरी जाण्यासाठी मोफत रुग्णवाहिका उपलब्ध करणे, लसीकरणासाठी जेष्ठ नागरिकांना मदत करणे आदी कामे शिवसेना पदाधिकारी करत असतात. मदत केंद्राच्या माध्यमातून आवश्यकतेनुसार कोव्हीड केअर सेंटर येथील रुग्णांना सकस आहाराचे वाटप केले जाते. त्याप्रमाणे सोशल मीडियाच्या माध्यमातून दररोज माहिती उपलब्ध करुन दिली जात आहे.

यामुळे नागरिकांना अचूक माहिती मिळत असून ग्रामीण रुग्णालयातील गर्दी कमी होण्यास मदत झाली. रविवारी ( ता. ३१ ) खासदार संजय जाधव यांनी मदत केंद्रास भेट देऊन शिवसेना पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले. या मदत केंद्रासाठी अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शहरप्रमुख बालाजी दहे, नंदू पाटील, विलास देशमुख, विठ्ठल जोगदंड, गणेशअप्पा चिंचोलकर, प्रमोद निळकंठ, शुभम ठाकुर, सतिष मगर, आप्पा भिसे, पिंटु फल्ले आदी प्रयत्न करीत आहेत.

येथे क्लिक करा - विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे गुरुवारी हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आले असता ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात गुरुवारी पत्रकार परिषदेत बोलत होते.

आयुर्वेदिक काढा वाटप

मदत केंद्राचे गणेश आप्पा चिंचोळकर कोरोना रुग्ण, ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी, सामान्य नागरिक असे एकूण ३०० जणांना दररोज मोफत आयुर्वेदिक काढा वाटप करतात. यासाठी शेतात जाऊन दररोज गुळवेल आणतात. मदत केंद्राचे अनिल जाधव यांनी चिंचोळकर यांना साहित्य उपलब्ध करून दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG वाहतुकीसाठी देशात 1,800 किमी पाइपलाइन; कोणकोणत्या राज्यांतून जाणार? काय बदलणार? वाचा...

Sugar Industry: साखर कारखान्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! ४ हजार कोटींचे सॉफ्ट लोन, व्याजाचा भारही सरकार उचलणार

Eknath Shinde: चाकणमधील उद्योगांचे स्थलांतर रोखणार’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्योजकांच्या समस्यांवर घेतले महत्त्वाचे निर्णय

Maratha Reservation: जरांगेंच्या आंदोलनाबाबत छगन भुजबळांचा मोठा दावा; म्हणाले, ‘लढाई ओबीसींविरोधात नाही, सरकारविरोधात’

US-Iran War: आम्हाला व्हेनेझुएला बनवायला निघाले होते; इराणचा ट्रम्प यांच्यावर घणाघात, राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला टोला

SCROLL FOR NEXT