suresh dhas suresh dhas
मराठवाडा

आमदार सुरेश धसांविरुद्ध तक्रार केल्याने मालमत्तेचे नुकसान

दोन दिवसांत आरोपींना अटक करून आम्हाला संरक्षण न पुरविल्यास पोलिस अधीक्षकांच्या घराबाहेर उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे

सकाळ वृत्तसेवा

दोन दिवसांत आरोपींना अटक करून आम्हाला संरक्षण न पुरविल्यास पोलिस अधीक्षकांच्या घराबाहेर उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे

आष्टी (बीड): बळजबरीने जागेत घुसून मालमत्तेचे नुकसान केल्याबाबत आमदार सुरेश धस यांच्याविरोधात पोलिसात तक्रार केली म्हणून अज्ञात व्यक्तींनी परत आमच्या जागेत येऊन मालमत्तेचे नुकसान केले. याबाबत आष्टी पोलिस तक्रार घेत नसल्याने आष्टीतील दांपत्याने मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांसह संबंधितांकडे निवेदनाद्वारे तक्रार केली आहे. तसेच दोन दिवसांत आरोपींना अटक करून आम्हाला संरक्षण न पुरविल्यास पोलिस अधीक्षकांच्या घराबाहेर उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.

याबाबत तक्रारदार तथा सामाजिक कार्यकर्ते मनोज सदाशिव चौधरी यांनी शुक्रवारी (ता. १३) दुपारी शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, सन २०१७ मध्ये आमदार सुरेश धस यांच्या पत्नीच्या विरोधात जिल्हा परिषदेच्या मुर्शदपूर (आष्टी) गटातून त्यांची पत्नी माधुरी यांनी निवडणूक लढविली होती. याचा राग मनात ठेवून आमदार धस हे त्यांचे नुकसान करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप चौधरी यांनी केला आहे.

चौधरी कुटुंबीयांचे बीड-नगर रस्त्यालगत तालुक्यातील पांढरी येथे २० आर अकृषिक क्षेत्र आहे. येथे हॉटेल बांधकामासाठी त्यांनी कंपाऊंड वॉल तसेच काही बांधकाम करून साहित्य ठेवले होते. या जागेतून पूर्वी लघुसिंचन तलाव कालवा गेलेला होता. तो सध्या अस्तित्वात नाही. परंतु कुटुंबाचे नुकसान व्हावे म्हणून आमदार धस यांनी सिंचन कार्यालय व तलाठी यांच्याशी संगनमत करून नऊ गुंठे जमीन कमी-जास्त पत्रकाआधारे कमी केली. याबाबत आपण न्यायालयात अपील केलेले आहे, असेही चौधरी यांनी सांगितले.

दरम्यान, मागील महिन्यात आ. धस यांनी समर्थकांसह येऊन हे क्षेत्र अतिक्रमणात येते असे सांगत बळजबरीने येथे जेसीबीद्वारे तोडफोड करून मोठे आर्थिक नुकसान केले. त्याबाबत ता. २४ जुलै रोजी आष्टी पोलिसांत फिर्याद दिली असून, धस यांच्यासह सुमारे ३८ जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे. त्याच कारणावरून अज्ञात लोकांनी परत आमच्या जागेत येऊन मालमत्तेचे पुन्हा नुकसान केले. याबाबतची तक्रार करण्यास गेलो असता आष्टी पोलिस तक्रार घेत नाहीत. त्यामुळे याबाबत मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलिस महासंचालक, विभागीय आयुक्त आदींना निवेदन दिले आहे, असे मनोज चौधरी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनोज जरांगे पाटलांनी मध्यरात्री उपोषण सोडलं, सरकारने मागण्या केल्या मान्य; विखे-पाटील म्हणाले, चर्चा यशस्वी

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

SCROLL FOR NEXT