suresh dhas suresh dhas
मराठवाडा

राजेश टोपे राज्याचे नव्हे; जालन्याचे आरोग्यमंत्री- सुरेश धस

मुंबई, पुणे, कोल्हापूरला भरपूर लशी उपलब्ध करून दिल्या जातात. जालन्यालाही पुरेशा लस भेटतात. पण, बीड जिल्ह्यालाच लस कमी उपलब्ध करून दिल्या जात असल्याचेही सुरेश धस म्हणाले

सकाळ वृत्तसेवा

बीड: कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर काहीही तयारी नाही. बालकांसाठी बेड नाहीत, बालरोग तज्ज्ञांची नेमणूक नाही. पाठपुरावा करूनही आरोग्यमंत्र्यांनी याचे साधे उत्तरही दिले नाही. राजेश टोपे (rajesh tope) हे राज्याचे नाही तर जालना जिल्ह्याचे आरोग्यमंत्री असल्याचा टोला, भाजप आमदार सुरेश धस (suresh dhas) यांनी शुक्रवारी (ता. १८) आढावा बैठकीनंतर लगावला.

मुंबई, पुणे, कोल्हापूरला भरपूर लशी उपलब्ध करून दिल्या जातात. जालन्यालाही पुरेशा लस भेटतात. पण, बीड जिल्ह्यालाच लस कमी उपलब्ध करून दिल्या जात असल्याचेही सुरेश धस म्हणाले. सारखे केंद्राकडे बोट दाखविणारे सरकार आहे. बीड जिल्ह्याचा डेथ रेट चारपेक्षा अधिक असून राज्यात सर्वाधिक असल्याचा आरोपही त्यांनी केला.

प्रशासनाकडून सांगितली जाणारी २.६५ टक्के ही आकडेवारी चूक असल्याचेही ते म्हणाले. आमदार स्थानिक निधीतून रुग्णवाहिकांसाठी निधी उपलब्ध करून देऊनही खर्चास मंजुरी नसल्याचा आरोपही त्यांनी केला. कांदा बियाणांच्या किमती वाढवून शेतकऱ्यांची लूट केली जात असल्याचेही सुरेश धस म्हणाले. पीक कर्ज वाटपही संथ गतीने आहे. पीक विम्याचा बीड पॅटर्न म्हणत असले तरी शेतकऱ्यांना एक रुपयाही भेटत नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NMIA: लोटस-इंस्पायर्ड डिझाईन, फ्युचरिस्टिक टेक अन्...; नवी मुंबई विमानतळ जागतिक पातळीवर चमकणार, कसं आहे नवं Airport?

Soybean Prices : शेतकऱ्यांच सोनं कवडीमोल भावात, सोयाबीनच्या भावावर शेतकऱ्यांची फरफट; ४ हजार ४०० रुपयांमध्ये खरेदी

Latest Marathi News Live Update : अनुसूचित जमातीमध्ये सहभागी करून आरक्षण देण्यात यावे , बंजारा समाजाचा धुळ्यात मोर्चा

Stanford University: ‘संजीवनी’च्या दाेन प्राध्यापकांचा अमेरिकेत संशोधनाचा झेंडा; सहा लाख संशोधकांत उच्चस्तरीय संशोधक म्हणून गणना

Bhoom Nagar Parishad Election : भूम नगरपरिषदेच्या दहा प्रभागाचे आरक्षण जाहीर; काही ठिकाणी खुशी काही ठिकाणी गम

SCROLL FOR NEXT