buck 
मराठवाडा

Crime : आश्चर्यम! पोलिस ठाण्यातील झाडपाला खाल्ला म्हणून बोकड मालकावर कारवाई

सकाळ डिजिटल टीम

पिशोर : जिथे चांगले चांगले जाण्यास टाळतात त्या पोलिस ठाण्यात कोणालाही खासकरून खाकी वर्दीला न घाबरता शिरायचे आणि केवळ शिरायचं नाही तर तिथे सरकारी आवारात नुकसान करायचे धाडस करण्याचा प्रकार पिशोर पोलिस ठाण्याच्या प्रवेश द्वारा समोर घडला.

ही धाडसी कामगिरी कोणी व्यक्तीने नव्हे तर चक्क एका बोकडाने केली आहे. पोलिसांनी सुद्धा या प्रकरणात अनेक गुन्ह्याच्या प्रकारात दुर्मिळ झालेली 'कारवाईची तत्परता' दाखवत बोकडाच्या मालकावर कारवाई करत त्याला कोर्टात हजर राहण्याचे समज देणारे पत्र दिले. मंगळवारी (ता.13) पिशोर पोलिस ठाण्यात हा प्रकार घडला.

याविषयी अधिक माहिती अशी की, पिशोर पोलिस ठाण्याच्या आवारात प्रवेशद्वारासमोर लॉन्स व झाडे यांची लागवड करण्यात आली आहे. पोलिस ठाण्याला सगळीकडून कुंपण नसल्याने येथे पोलिस ठाण्यात काही कामानिमित्त आलेल्या सर्व प्रकारच्या नागरिकांसोबत काही प्राणीसुद्धा सर्रास येथे आढळतात. मंगळवारी असाच एक बोकड पोलिस ठाण्यात शिरला व शासकीय आवारातील लॉन्स व परिसरातील झाडे खाऊन नुकसान केले.

इतर अनेक प्रकरणात सोयीस्कर चालढकल करणाऱ्या पोलिसांनी या प्रकरणात मात्र 'तत्परता' दाखवत बोकड मालक रऊफ रज्जाक सय्यद याच्यावर पोलिस कायदा कलम 90 (अ) प्रमाणे कारवाई करून बुधवारी सकाळी कोर्टात हजर राहण्याची लेखी समज देण्यात आली.

या आगळ्यावेगळ्या कारवाईची बोकड मालकासह ज्यांना कोणाला माहिती झाली ते सुद्धा पोलिसांच्या या 'अतितत्पर' व 'जागरूक' कारवाई बद्दल आश्चर्य व्यक्त करत आहेत. अशीच तत्परता पोलिस विभाग इतर 'अनेक प्रकरणात' दाखवतील का असा प्रश्न उपस्थित करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Rate Today: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर! मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रात आजचा भाव किती? जाणून घ्या CNGचे दरही

अरुणा इराणी यांच्यावर दु:खाचा डोंगर; पती कुकू कोहली यांचं 77व्या वर्षी निधन

Kolhapur Konkan New Road: कोल्हापुरातून कोकणात जाण्यासाठी आणखी एक घाटमार्ग, घोटगे-सोनवडे मार्गासाठी केंद्राची मंजुरी; कुडाळ-कोल्हापूर अंतर होणार कमी

Latest Marathi News Live Update : फॉलोऑन टाळण्यासाठी श्रीलंकेला 38 धावांची गरज; सोनल दिनूषाच्या खेळीमुळे भारताची चिंता वाढली

Sugar Price Hike Maharashtra : साखरेचे भाव क्विंटलमागे 900 रुपयांनी घसरले; तरीही किरकोळ बाजारात दर 67 रुपयांवर, फायदा साठेबाजांचाच?

SCROLL FOR NEXT