tapasani 
मराठवाडा

‘या’ तालुक्‍यात नऊ हजार ७८१ बालकांचे सर्वेक्षण, का ते वाचा...

संजय कापसे

कळमनुरी ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील तीन वर्षांखालील नऊ हजार ७८१ बालकांचे अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या माध्यमातून आरोग्य सर्वेक्षण करण्यात आले आहे. या बालकांना कुठल्याही प्रकारचा गंभीर आजार नसल्याची नोंद सर्वेक्षणामध्ये नोंदविण्यात आली आहे. विशेष म्हणजे अंगणवाडी कार्यकर्तीच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाला ‘कोरोना’विषयी माहिती दिली जात आहे.

‘कोरोना’ विषाणुजन्य आजारामुळे वयोवृद्ध आजारी नागरिकांप्रमाणे तीन वर्षांखालील बालकांनाही या आजाराचा संसर्गाचा धोका होऊ शकतो, हे लक्षात घेता शासनाने प्रत्येक कुटुंबातील तीन वर्षांखालील बालकांची आरोग्य तपासणी करण्याची मोहीम हाती घेतली होती. 

२५० अंगणवाडी सेविकांची मदत
प्रत्येक गावात कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीसांना जबाबदारी नेमून देण्यात आली होती. त्यानुषंगाने एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत असलेल्या २५० अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून तालुक्यातील प्रत्येक गावात प्रत्येक कुटुंबात असलेल्या तीन वर्षांखालील बालकांची आरोग्य तपासणी सर्वेक्षण मोहीम हाती घेण्यात आली होती. यामधून कळमनुरी विभागांतर्गत १०६ अंगणवाडी कार्यकर्तींच्या माध्यमातून बालकांची आरोग्य तपासणी सर्वेक्षण मोहीम राबविण्यात आली. यामध्ये ३९१० बालकांची आरोग्य तपासणी सर्वेक्षण करण्यात आले.

उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रावर पाठविले 
बालकाला सर्दी ताप किंवा इतर आजारांची लक्षणे आहेत काय, याच्या नोंदी घेण्यात आल्या. आखाडा बाळापूर विभागांतर्गत १४४ अंगणवाडी कार्यकर्तीच्या माध्यमातून विभागांतर्गत प्रत्येक गावात व कुटुंबाला भेटी देत तीन वर्षांखालील पाच हजार ८४७ बालकांची आरोग्यविषयक माहिती नोंदविण्यात आली. (ता. १५) एप्रिलपासून अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी तीन वर्षांखालील बालकांचे आरोग्यविषयक सर्वेक्षण पूर्ण करून नोंदी घेतल्या. यानंतर यामध्ये पंधरा ते वीस बालकांना केवळ सर्दी, ताप ही लक्षणे आढळून आली. या बालकांवर उपचार करण्यासाठी जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर पाठविण्यात आले.

घ्यावयाच्या खबरदारीची दिली माहिती  
सर्वेक्षणाची एक फेरी पूर्ण झाल्यानंतर अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या माध्यमातून बालकांची पुनर्तपासणी व सर्वेक्षण करण्याचे काम हाती घेण्यात आले असून या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाला बालकांच्या आरोग्यविषयक माहितीप्रमाणेच कोरोना विषाणुजन्य संसर्ग आजाराची माहिती व घ्यावयाची खबरदारी याबाबतही अंगणवाडी सेविका व मदतनीसांमार्फत माहिती दिली जात आहे.


मुंबई येथील तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन 
‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर गावपातळीवर काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीसांना घरबसल्या मोबाइलवरच झूम ॲपच्या माध्यमातून कोरोना आजार, घ्यावयाची काळजी, उपाययोजना व बालकांचे करण्यात येत असलेले सर्वेक्षण या संदर्भात मुंबई येथील तज्ज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली माहिती देण्यात आली आहे. 
- राजकुमार धापसे, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidhan Parishad Election : महायुतीचा जागावाटापाच तिढा सुटला, १७ जागांसाठीचा अंतिम फॉर्म्युला निश्चित, कुणाच्या वाट्याला किती जागा?

IPL 2026, RCB vs GT Final: टॉस हरूनही शुभमन गिल म्हणतोय, मनासारखंच झालं! फायनलसाठी कशी आहे Playing XI

Eknath Shinde: बीएमसीपासून विधान परिषदपर्यंत भाजपकडून धक्के... एकनाथ शिंदेंनी सुरू केली मोठी तयारी; महाराष्ट्राच्या राजकारणात नवी चुरस

IPL 2026 Final, RCB vs GT live: बंगळुरू - गुजरात संघात महामुकाबला! रजत पाटिदारने जिंकला टॉस

Mumbai Water Metro: मुंबईकरांसाठी गुडन्यूज! पहिली वॉटर मेट्रो दाखल, प्रवासी सेवेत कधी उतरणार?

SCROLL FOR NEXT