jalna sakal
मराठवाडा

Maratha Reservation : मराठा समाजाचे मागसलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षण ; नागरिकांनी माहिती देण्यासाठी सहकार्य करावे : जिल्हाधिकारी पांचाळ यांचे आवाहन

राज्य मागासवर्ग आयोगामार्फत जिल्ह्यातील सर्व नोडल अधिकारी तथा तहसीलदार, नायब तहसीलदार व मास्टर ट्रेनर असे एकूण ४२ अधिकाऱ्यांचे मराठा समाज व खुल्या प्रवर्गाचे, सामाजिक व शैक्षणिक मागसलेपण तपासण्यासाठी करायच्या सर्वेक्षणाच्या कामकाजाबाबत शनिवारी (ता. २०) जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षण घेण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

जालना : राज्य मागासवर्ग आयोगामार्फत जिल्ह्यातील सर्व नोडल अधिकारी तथा तहसीलदार, नायब तहसीलदार व मास्टर ट्रेनर असे एकूण ४२ अधिकाऱ्यांचे मराठा समाज व खुल्या प्रवर्गाचे, सामाजिक व शैक्षणिक मागसलेपण तपासण्यासाठी करायच्या सर्वेक्षणाच्या कामकाजाबाबत शनिवारी (ता. २०) जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षण घेण्यात आले.

ता.२३ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या या सर्वेक्षणासाठी नागरिकांनी माहिती देण्याकरिता प्रगणकांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यावेळी यांनी केले आहे. सर्वेक्षण हे गोखले इन्स्टिट्यूट या संस्थेकडून तयार करण्यात आलेल्या मोबाईल ॲप्लीकेशन प्रणालीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

सर्वेक्षणासाठी तालुकास्तरावर तहसीलदार हे नोडल अधिकारी व नायब तहसीलदार यांना सहायक नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. ता.२१ व ता. २२ जानेवारी तालुकास्तरावर प्रगणकांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. हे सर्वेक्षण ता. ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना सर्व नोडल अधिकारी यांना यावेळी देण्यात आल्या.

तालुकानिहाय प्रगणक व पर्यवेक्षकांची आकडेवारी

  • जालना- नियुक्त प्रगणकांची संख्या-२९२, नियुक्त पर्यवेक्षकांची संख्या-२१.

  • अंबड- नियुक्त प्रगणकांची संख्या-३४५, नियुक्त पर्यवेक्षकांची संख्या-२३.

  • भोकरदन- नियुक्त प्रगणकांची संख्या-६१३, नियुक्त पर्यवेक्षकांची संख्या-४१.

  • जाफराबाद- नियुक्त प्रगणकांची संख्या-२७९, नियुक्त पर्यवेक्षकांची संख्या-१९.

  • मंठा- नियुक्त प्रगणकांची संख्या-३३८, नियुक्त पर्यवेक्षकांची संख्या-२३.

  • बदनापूर- नियुक्त प्रगणकांची संख्या-२६९, नियुक्त पर्यवेक्षकांची संख्या-१८.

  • घनसावंगी- नियुक्त प्रगणकांची संख्या-४८३, नियुक्त पर्यवेक्षकांची संख्या-३२.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs PAK: मग कसा होता रविवार? इरफान पठाणचा पाकिस्तानला ट्रोल करत भन्नाट डान्स; पाहा Video

Avi Prasad IAS : चर्चित आयएएस अधिकाऱ्याने केले तिसरे लग्न, आधीच्या दोन्ही पत्नी आहेत जिल्हाधिकारी, तिसरी मंत्रालयात उपसचिव

'ती व्यक्ती आपल्यासोबत असली की...' जुई गडकरीच्या लाईफ पार्टनरबद्दल काय अपेक्षा? म्हणाली...'माझ्यासाठी खरं प्रेम हे...'

Success Story: शेतीसंघर्षातून उभी राहिली अधिकारीपदाची स्वप्ने; चिंचमंडळच्या शेतकरी पुत्राची तालुका कृषी अधिकारी पदाला गवसणी

Stock Market Today: शेअर बाजाराची लाल रंगात सुरुवात मात्र काही मिनिटांतच तेजीत! TCS-Infosys शेअर्सची स्थिती काय? टॉप गेनर्स कोण?

SCROLL FOR NEXT