Susham Andhare criticize bjp insulting women and Chhatrapati Shivaji Maharaj politics Esakal
मराठवाडा

Susham Andhare : भाजपकडून संस्कृतीला गालबोट; सुषमा अंधारे

सुषमा अंधारे : महापुरुष, महिलांच्या अपमानावरून निशाणा

सकाळ वृत्तसेवा

उमरगा : कृती कार्यक्रम, विकासाच्या मुद्द्यावर अपयशी ठरलेला भाजपने लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी ठरवून महापुरुषांचा अपमान करण्याचा करेक्ट कार्यक्रम करत आहे, असा आरोप शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उप नेत्या सुषमा अंधारे यांनी केला. महाप्रबोधन यात्रेनिमित्त अंधारे सोमवारी (ता. पाच) येथे आल्या होत्या. पत्रकारांशी बोलताना त्यांनी महाप्रबोधन यात्रेची संकल्पना सांगितली आणि भाजपवर टीका केली. त्या म्हणाल्या, राष्ट्रपुरुष, महापुरुषांच्या कर्तृत्वाची महाराष्ट्राला गौरवशाली परंपरा आहे, मात्र भाजपच्या राजकारणामुळे संस्कृतीला गालबोट लागत आहे.

त्यामुळे धर्मनिरपेक्षता, अखंडतेच्या विचारांचे बीजारोपण पुन्हा एकदा करण्याची गरज आहे. नेमकी हीच भूमिका घेऊन प्रबोधन यात्रेत विचारमंथन होत आहे. यात्रेत प्रश्न, मुद्दे उपस्थित करीत आहे. त्याचे उत्तर मिळण्याऐवजी एकेरी टीका होत आहे. भाऊ, दादा, अण्णा, काका म्हणून प्रश्न विचारत असताना विरोधक मात्र माझा ‘बाई’ म्हणून उल्लेख करतात. याचा अर्थ त्यांचे नेतृत्व, कर्तृत्व आणि संस्काराची ओळख महाराष्ट्राला होत आहे. बौद्धिक उंचीने आमनेसामने चर्चा करायला या, हरले तर तुमचे शिष्यत्व स्वीकारेन, असे आव्हान त्यांनी भाजप व मनसेच्या नेतेमंडळींना दिले.

मनसेचे प्रकाश महाजन यांच्या आरोपाला बगल देत त्यांनी प्रमोद महाजन यांच्या कुशल नेतृत्वाचा संदर्भ दिला. त्या म्हणाल्या, महाजन - मुंडे यांचे अतूट नाते आहे. त्याच विचारसरणीतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर राजकीय कुरघोडी करीत आहेत. भाची म्हणून प्रकाश महाजन यांना त्याचे काहीच वाटत नाही.

मी शिवसेनेतले शेंडेफळ

एकेकाळी मी शिवसेनेची टीकाकार होते. आता शिवसेनेचे जीव तोडून काम करीत आहे. अत्यंत संयमी, मितभाषी असलेले उद्धव ठाकरे यांच्या आजारपणावर टीका करणाऱ्या विरोधकांच्या बुद्धीची कीव येते. मुख्यमंत्रिपदी महिलेला स्थान देण्याचे सूतोवाच ठाकरे यांनी केल्याने आपला आशावाद आहे का, या प्रश्नावर हसून त्या म्हणाल्या, मी शिवसैनिक आहे आणि शेंडेफळ आहे. पदापेक्षा काम करीत रहाण्याला प्राधान्य देणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Mohibullah Ansari : कोण आहेत मोहिबुल्लाह अंसारी? अमेरिकेत मिळणार ‘एशियन हिरो अवॉर्ड’; जाणून घ्या IPS अधिकाऱ्याचा प्रेरणादायी प्रवास

Ladki Bahin Yojana August 2026 Installment GR : लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट हप्त्याचा GR आला; खात्यात 1,500 जमा होणार की 3,000 शासन निर्णयात नेमकं काय?

Vinod Kambli ने ठाण्याच्या हॉस्पिटलमधून पोस्ट केला Video; प्रकृतीबाबत सांगायचं सोडून, काय बोलतोय ऐका; नेटकरी म्हणाले...

Latest Marathi News Live Update : लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल; २२ तासांपासून विसर्जन मिरवणूक, थोड्याच वेळात बाप्पाला निरोप

IND vs WI: विराट कोहली अन् शुभमन गिल यांच्यात 'कड्याकाचं' भांडण? स्टार फलंदाज कर्णधाराला बोट दाखवत बडबडला Video Viral

SCROLL FOR NEXT