sakal
मराठवाडा

लातूर : तीन टप्प्यांतील एफआरपीला ‘स्वाभिमानी’चा विरोध

लातूर जिल्ह्यातून जाणार सर्वाधिक मिस-कॉल

सकाळ वृत्तसेवा

लातूर: केंद्र सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम तीन टप्प्यांत देण्याचा निर्णय घेतला असून, राज्य सरकारनेही त्याला सहमती दर्शवली आहे. याचा विरोध करण्यासाठी राबविण्यात येणारी मिस कॉल मोहीम गतिमान करून लातूर जिल्ह्यातून सर्वाधिक मिस कॉल करण्याचा निर्धार स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या विधी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष ॲड. विजय जाधव, जिल्हाध्यक्ष धर्मराज पाटील, माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोरे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पत्रकार भवन येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. संघटनेच्या संस्थापक अध्यक्षांनी सरकारच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी ८४४८१८३७५१ या क्रमांकावर मिस कॉल देण्याची मोहीम सुरू केली आहे. जिल्ह्यात ही मोहीम मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे. यावर्षी अतिवृष्टी व करपा रोगाने होणाऱ्या नुकसानीची माहिती वेबसाइटवर पाठविण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. ही साइट सुरू होत नाही.

अनेक शेतकऱ्यांना स्मार्ट मोबाईल वापरता येत नाही. त्यामुळे सरकारने कृषी व महसूल खात्यामार्फत प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करावेत. नुकसानीची नोंद घ्यावी. पीक कापणी प्रयोग मंडळनिहाय न ठेवता गावनिहाय करावा. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TET Exam Paper Leak : कोल्हापुरात टीईटीचा पेपर फोडण्याचा प्रयत्न, पोलिसांनी छापा टाकताच एकच खळबळ उडाली; शिक्षकांचाही समावेश

Viral Video : लग्नादिवशीच नवरीचा अपघात, रुग्णालयात पार पडलं लग्न, नवरदेवाने जिंकली लाखोंची मने; पाहा हृदस्पर्शी व्हिडिओ

Smriti - Palash Love story: स्मृती मानधना - पलाश मुच्छल यांची पहिली भेट कधी झाली अन् कशी सुरू झाली लव्हस्टोरी?

African Swine Fever : नाशिकमध्ये 'आफ्रिकन स्वाइन फीव्हर'चा शिरकाव! जिल्हाधिकाऱ्यांकडून 'बाधित क्षेत्र' घोषित

Viral Video 'डोला रे डोला' धकधक गर्ल माधुरी दीक्षितचा अफलातून डान्स, व्हिडिओ चर्चेत

SCROLL FOR NEXT