parbhani
parbhani 
मराठवाडा

परभणी : स्वाभीमानीकडून शासन निर्णयाची होळी 

कैलास चव्हाण

परभणी : म्हशी व गायीच्या दुधामागे प्रतिलिटर दोन रुपयाची कपात करणारा ता.27 सप्टेंबर 2018 चा शासन निर्णय रद्द करण्याची मागणी करत स्वाभीमानी शेतकरी संघटनेने परभणीत बुधवारी (ता. 31) त्या निर्णयाची होळी केली.

मराठवाड्यात दुष्काळामुळे जनावरांना चारा विकत घेण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे.अनेक शेतकरी जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसायत उतरले आहेत. मात्र 27 सप्टेंबर रोजीच्या निर्णयामुळे दुधामागे प्रतिलिटर दोन रुपयाची होणारी कपात शेतकऱ्यांचे नुकसान करणारी आहे.

दुष्काळी परिस्थितीत ही कपात परवडणारी नसून 12 नोव्हेंबर पर्यंत हा निर्णय रद्द करण्याची मागणी स्वाभीमानी शेतकरी संघटनेने करत बुधवारी या निर्णयाची होळी येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील मैदानात केली. यावेळी जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, उपाध्यक्षा केशव आरमळ, भास्कर खटिंग, रामेश्वर आवरगंड, रामप्रसाद गमे, डिगंबर पवार, मुंजाजी लोडे, राजू शिंदे, दिपक गरुड आदी सहभागी झाले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satwiksairaj Rankireddy Chirag Shetty : सात्विक - चिराग जोडीनं थायलंड ओपनची गाठली फायनल

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींनी लोकसभा निवडणूक का लढवली नाही? कारण आलं समोर

किर्झिगस्तानमध्ये हिंसाचार! स्थानिक लोकांकडून पाकिस्तानसह भारतीय विद्यार्थ्यांनाही लक्ष्य; परराष्ट्रमंत्र्यांनी घेतली दखल

Latest Marathi News Live Update : मुलुंड घटनेप्रकरणी आरोपींना एक दिवसाची कोठडी

SCROLL FOR NEXT