Sarpanch Mangesh Sable and Vasant Bansod sakal
मराठवाडा

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी तहसीलदारांची खुर्ची जाळून आंदोलन; तिघांविरोधात गुन्हा दाखल

मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावल्याने निषेध.

नवनाथ इधाटे

फुलंब्री - नेहमीच आपल्या आगळ्यावेगळ्या आंदोलनाने राज्यभर प्रसिद्ध असलेले फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे व त्यांचे दोन साथीदार वसंत बनसोड, आजीनाथ साबळे यांनी आक्रमक होऊन मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावल्याने फुलंब्रीचे तहसीलदार डॉ. कृष्णा कानगुले यांची खुर्ची मंगळवारी (ता. २४) जाळून निषेध व्यक्त केला. दरम्यान तहसीलदाराची खुर्ची जाळल्या प्रकरणी तीन जनाविरुद्ध फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मराठा आरक्षणासाठी मनोज जारंगे पाटील हे अंतरवाली सराटी येथे मागील गेल्या सात दिवसापासून उपोषणाला बसले आहे. सरकार त्यांच्या आंदोलनाची दखल घेत नसल्याने त्यांची तब्येत खालावली आहे. त्यामुळे नेहमीच आपल्या आक्रमक आंदोलनाने चर्चेत राहणारे मंगेश संजय साबळे व त्यांचे दोन साथीदार वसंत शामराव बनसोड, आजीनाथ नारायण साबळे यांनी तहसील कार्यालयातील तहसीलदाराच्या दालनातून खुर्ची उचलून आणत तहसीलच्या मुख्य प्रवेशद्वारावरील मोकळ्या जागेत ज्वलनशील पदार्थ खुर्चीवर टाकून जाळत सरकारचा निषेध व्यक्त केला.

हा सर्व प्रकार तहसील कार्यालयात असणारे कर्मचारी व कामानिमित्त आलेले नागरिक उघड्या डोळ्यांनी बघत होते. आक्रमक होऊन सरकार विरोधी विविध घोषणा देण्यात आल्या. याप्रकरणी फुलंब्री पोलीस ठाण्यात मंगेश साबळे, वसंत बनसोड आणि आजिनाथ साबळे या तिघा विरुद्ध शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगेश साबळेच्या आंदोलनातील ठळक मुद्दे -

तहसीलदारांची खुर्ची जाळून आंदोलन करताना सरपंच मंगेश साबळे म्हणाले की,

* छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचा कधीही अपमान सहन करणार नाही.

* आपला माणूस मरायला लागला.., मराठ्यांना जागे व्हा.. रस्त्यावर या

* आपल्या माणसाला वाचवा, मराठ्यांनो बाहेर या,

* सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरा,

* एक मराठा, लाख मराठा

* मनोज जरांगे यांचे बलिदान घेण्याचे सरकारने ठरवले आहे, हे आम्ही होऊ देणार नाही.

* खुर्ची जाळली म्हणून आमचं एन्काऊंटर करा, आम्हाला फाशी द्या..,

मंगेश साबळे यांचे आतापर्यंतचे महत्त्वाचे आंदोलन -

* 2019 मध्ये जनआशीर्वाद यात्रेत तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फुलंब्रीतील सभेत गोंधळ

* वडीलाच्या उपचारासाठी टीव्ही सेंटरच्या टॉवरवर जाऊन आंदोलन

* ग्रामपंचायत गेवराई पायगा येथील सरपंच / ग्रामसेवकाची खुर्ची जाळून निषेध

* मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर वर्षभरापूर्वी पाल फाटा येथे स्वतःची नवी कोरी कार जाळून निषेध

* एड.गुणरत्न सदावर्ते यांची मुंबई येथे जाऊन कार फोडली

* तहसीलदार कार्यालयात औषध फवारणीचा भोंगा वाजवून आंदोलन

* तहसील कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वारावर अर्ध नग्न आंदोलन

* रोहित्रासाठी आळंद येथे विद्युत वितरण कार्यालयात सिलेंडर कमरेला बांधून आंदोलन

* फुलंब्रीचे विद्युत वितरण विभागाचे उपअभियंता यांना मारहाण

* कुशल कामाच्या बिलासाठी चिखलात बसून आंदोलन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT