takarwan beed village drinking and agriculture water crisis drought Sakal
मराठवाडा

Beed News : शेतकऱ्यांची पाण्याच्या शोधात धावाधाव; विहीर खोलीकरणासह बोअरवेलवर धडाका

गतवर्षी कमी झालेल्या पावसामुळे सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाणी नसल्यामुळे पिके वाळून गेली आहेत. काही ठिकाणी जनावरांना प्यायला पाणी नसल्याची परिस्थिती आहे.

अशोक खुळे

टाकरवण : गतवर्षी कमी झालेल्या पावसामुळे सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाणी नसल्यामुळे पिके वाळून गेली आहेत. काही ठिकाणी जनावरांना प्यायला पाणी नसल्याची परिस्थिती आहे. नागरिकांना दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. टाकरवणसह परिसरात शेतीच्या पाण्यासह पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट निर्माण झाले.

शेतकऱ्यांचे पाण्याअभावी मोठे नुकसान होत असल्याने शेतकरी पाण्याच्या शोधात आहेत. टाकरवण परिसरातून गोदावरी नदी गेल्याने शेतकऱ्यांनी या नदीच्या पाण्यावर मोठ्या प्रमाणात सिंचन क्षेत्र वाढवले आहे.

या पाण्याखाली शेतकऱ्यांनी ऊस, मोसंबी, डाळिंब आदी पिकांची लागवड केली. परंतु, अत्यल्प पावसामुळे गोदावरी नदीतील पाणीसाठाही जेमतेम राहिल्याने शेतकऱ्यांची पिके धोक्यात आली आहेत. फळबागा अखेरच्या घटका मोजत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

बाजरी, भुईमूग, ज्वारीसारखी पिके वाळून जात आहेत, तर विहिरींच्या पाण्यानेही तळ गाठल्याने शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे आहे. पिके वाचविण्यासाठी शेतकरी विहिरींचे खोलीकरण करणे, विहिरीत आडवे बोअर घेणे, नवीन बोअरवेल घेत पाण्याचा शोध घेत आहेत.

बंधाऱ्यात अल्प पाणीसाठा

परिसरातून गोदावरी नदी गेल्याने सिंचन क्षेत्र वाढण्यास मदत झाली आहे. गोदावरीवर मंगरूळ, शेलगावथडी या ठिकाणी उच्चपातळी बंधारे बांधण्यात आले. सध्या हे बंधारे कोरडे पडण्याच्या अवस्थेत आहेत.

बाजरी वाळून गेलीये, प्यायलाही पाणी नाही. विहिरीलासुद्धा आता पाणी थोडंच शिल्लक राहिलंय. त्यामुळे यंदाचा उन्हाळा कसा जातोय तो कुणास ठाऊक, अनेक नागरिकांवर पाणी विकत घेण्याची वेळी आली आहे.

- पंडित आडागळे, टाकरवण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT