file photo 
मराठवाडा

कोरोना नियमाचे पालन न करणाऱ्या लाँन्स, मंगल कार्यालयावर कारवाई करा- जिल्हाधिकारी

राजेश दारव्हेकर

हिंगोली : जिल्ह्यात कोरोना रूग्णसंख्या वाढत असताना लॉन्स व मंगल कार्यालयात आयोजित लग्न समारंभात कोरोना नियमाचे पालन करण्याबाबत वेळोवेळी सूचना देऊन त्याचे पालन होत नसल्याने आता लॉन्स व मंगल कार्यालयांना ५० हजाराचा दंड ठोठावा व नोटीस द्यावी असा आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी प्रशासकीय यंत्रणेला दिले आहेत.

जिल्ह्यात कोरोना रूग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून  जिल्ह्यातील लॉन्स व मंगल कार्यालयात लग्न समारंभात कोरोनाच्या अनुषंगाने नियमाचे पालन करण्याच्या सूचना देऊनही त्याचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आले असून ही  बाब अतिशय गंभीर स्वरूपाची असल्याने कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.  

त्यामुळे नियमाचे पालन न करणाऱ्या लॉन्स व मंगल कार्यालयावर दंडात्मक कारवाईचे आदेश जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी प्रशासकीय यंत्रणेला दिले आहेत. नियमाचे पालन न करणाऱ्या लॉन्स व मंगल कार्यालयांना ५० हजार रूपये दंड ठोठावा व नोटीस द्यावी तसेच परत त्यांनी नियमाचे दुसऱ्यांदा पालन न केल्यास पुन्हा ५० हजाराचा दंड ठोकून लॉन्स व मंगल कार्यालय सिल करावे असा आदेशही जिल्हाधिकारी जयवंशी यांनी दिला आहे.

दरम्यान, हिंगोली  जिल्ह्यात सोमवारी ( ता. २२) नऊ रुग्ण आढळून आले आहेत. आठ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आढळलेल्या रुग्णांत तीन रँपीड टेस्ट तर  सहा रुग्ण आरटीपीसीआर टेस्टमध्ये आढळून आले आहेत. आठ रुग्ण बरे झाल्यामुळे त्याला सुट्टी देण्यात आली. आजपर्यंत जिल्ह्यात एकुण तीन हजार ९१६ रुग्ण झाले आहेत. त्यापैकी तीन हजार ७५२ रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली. आजघडीला एकूण १०६ रुग्णांवर उपचार चालु आहेत आणि ५८ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नितीन गडकरींना मुंबईतील वाहतूक कोंडीचा फटका; नियोजित कार्यक्रमात पोहोचण्यास तासभर उशीर; म्हणाले, जुन्या उड्डाणपुलांऐवजी...

ENG vs PAK, Test: इंग्लंडचा पाकिस्तानला व्हाईटवॉश! बर्मिंगहॅम कसोटीतील विजयानंतर WTC Points Table मध्येही मोठे बदल

Youth Sena Leader Car Crash: युवासेना पदाधिकाऱ्याच्या थारची दुचाकीला धडक; कामगार गंभीर जखमी, खर्च न दिल्याचा आरोप करत गुन्हा दाखल

Dr. Ratnakar Mahajan Pass Away: ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. रत्नाकर महाजन यांचे निधन; महाराष्ट्रातील पुरोगामी, वैचारिक चळवळीतील अभ्यासू आवाज हरपला

Marathi News Live Updates: स्वच्छता साहित्यासाठी डीबीटी अशक्य, स्थायी समितीसमोर फेरप्रस्ताव

SCROLL FOR NEXT