file photo 
मराठवाडा

गव्हाची पेरणी करतांना ही घ्या काळजी

मंगेश शेवाळकर

हिंगोली  : जिल्ह्यात सिंचनासाठी उपयुक्त ठरणारे इसापूर व सिध्देश्वर धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा झाल्यामुळे यावर्षी गव्हाच्या पेरणी क्षेत्रामध्ये मोठी वाढ होणार आहे. मात्र पेरणी करताना शेतकऱ्यांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे.

हिंगोली जिल्ह्यात रब्बी हंगामाची पेरणी क्षेत्र दीड लाख हेक्टर आहे. यापैकी सुमारे साठ हजार हेक्टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी अपेक्षित आहे. मात्र मागील चार ते पाच वर्षात अपुऱ्या पावसामुळे गव्हाचे पेरणी क्षेत्रात घटून हरभर्‍याची पेरणी क्षेत्र चांगलेच वाढले होते. मात्र आता. या वर्षी सिद्धेश्वर येलदरी विसापूर धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा झाला आहे. येलदरी धरण 98 टक्के वर गेले आहे. सिद्धेश्वर मध्ये 88 टक्के तर इसापूर मधे सुमारे 80 टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे गव्हासाठी चांगल्या पाणी पाळी मिळणार आहेत. मात्र गव्हाची पेरणी करताना शेतकऱ्यांनी उत्पादनवाढीसाठी बीज प्रक्रिया सोबतच खत व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.

नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडयातच पेरणीची शिफारस

 बागायती गव्हाच्या वेळेवर पेरणीसाठी नोव्हेंबर महिन्याचा पहिला पंधरवडा ही शिफारस असली, तरी ऊसतोडणीनंतर, तसेच खरीप पिकांच्या काढणीस उशीर होण्याने गहू पिकांची लागवड उशिरा करावी लागते.

शक्यतो वेळेत  करा पेरणी

 बागायत गव्हाच्या उशिरा पेरणीची शिफारस ही १६ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीसाठी आहे. मात्र, काही ठिकाणी १५ डिसेंबरनंतरही गव्हाची पेरणी केली जाते. वास्तविक १५ नोव्हेंबरनंतर पेरणी केलेल्या प्रत्येक उशिराच्या पंधरवड्यात गव्हाची पेरणी केल्याने एकरी १ क्विंटल उत्पादन कमी मिळते. 

उशिरा पेरणीसाठी वापरायचे वाण

गव्हाच्या बागायती उशिरा पेरणीसाठी एनआयएडब्लू-३४, एकेएडब्लू-४६२७, फुले समाधान (एनआयएडब्लू १९९४) या सरबती वाणांची निवड करावी. प्रतिएकरी ५० ते ६० किलो बियाणे रासायनिक खतांच्या पहिल्या हप्त्यासह  एकेरी पद्धतीने १८ सें.मी. अंतरावर पेरावे. 

 बिज प्रक्रिया करा

गव्हाच्या बियाण्यास पेरणीपूर्वी  थायरम या बुरशीनाशकाची ३ ग्रॅम प्रतिकिलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. तसेच प्रति १० किलो बियाण्यास २५० ग्रॅम अॅझोटोबॅक्टर व २५० ग्रॅम पीएसबी या जीवाणू संवर्धनाची बीजप्रक्रिया करावी. पेरणी उथळ म्हणजे ५ ते ६ सें.मी. खोल करावी. त्यामुळे उगवण चांगली होते. पेरणी उभी-आडवी अशी दोन्ही बाजूने न करता ती एकेरी करावी. बियाणे झाकण्यासाठी कुळव उलटा करून चालवावा म्हणजे बी व्यवस्थित दबून झाकले जाते. जमिनीचा उतार लक्षात घेऊन गव्हासाठी २.५ ते ४ मीटर रुंदीचे व ७ ते २५ मीटर लांब या आकाराचे सारे पाडावेत.

असे करा खत व्यवस्थापन

जिरायत पेरणी - १६ किलो नत्र व ८ किलो स्फुरद प्रति एकरी पेरणीवेळी द्यावे. तर बागायत वेळेवर पेरणी - २४ किलो नत्र, २४ किलो स्फुरद व १६ किलो पालाश प्रतिएकरी पेरणीच्या वेळी द्यावे.  तसेच २४ किलो नत्र प्रतिएकरी पेरणीनंतर तीन आठवड्यांनी खुरपणी झाल्यावर पहिल्या पाण्याच्या वेळी द्यावे.

उशिरा पेरणी झाल्यास हे करा

 बागायतमधे उशिरा पेरणी झाल्यास प्रत्येकी ४० किलो नत्र, स्फुरद आणि पालाश प्रतिएकरी पेरणीच्या वेळी व १६ किलो नत्र प्रतिएकरी पेरणीनंतर तीन आठवड्यांनी द्यावे. लोहाची कमतरता असणाऱ्या जमिनीत ८ किलो फेरस सल्फेट हे ४० किलो शेणखतात १५ दिवस मुरवून नंतर द्यावे. 

पीकांच्या वाढीमधे  काय करावे

पीक ५५ ते ७० दिवसांचे असताना १९:१९:१९ या विद्राव्य खताची २ टक्के (२० ग्रॅम प्रति लिटर पाणी) याप्रमाणे दोनवेळा फवारणी करावी. दाणे भरण्याच्या अवस्थेत २ टक्के युरियाची (२० ग्रॅम प्रति लिटर पाणी) फवारणी करावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Picnic Bus accident : भीषण अपघात! विद्यार्थ्यांना सहलीवरून परत आणणारी बस जम्मूत उलटली

Ishan Kishan: पुण्याच्या मैदानात सिलेक्टरला बॅट दाखवली, वर्ल्डकपच्या संघात एन्ट्री घेतली; ईशान किशनच्या स्वप्नवत पुनरागमनाची गोष्ट

Nora Fatehi Accident: अभिनेत्री नोरा फतेहीचा अपघात, डोक्याला दुखापत; मद्यधुंद कार चालकाने दिली धडक!

Palghar News : पालघरमध्ये पाच वर्षीय मुलीवर अत्याचाराचा धक्कादायक प्रकार; बालसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

Velhe Accident : तीव्र उतारावर नियंत्रण सुटले अन् टेम्पो पलटी; पाबे घाटात भीषण अपघात; १३ मजुर जखमी!

SCROLL FOR NEXT