Talathi Exam sakal
मराठवाडा

Talathi Recruitment Exam : तलाठी भरती परीक्षेच्या नियोजनाचा फज्जा; विद्यार्थ्यांच्या दिले भलतेच केंद्र

राज्य शासनाच्या महसूल विभागांतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील पदाच्या परीक्षा केंद्रासाठी उमेदवाराने दिलेल्या तीन पर्याय सोडून चौथेच केंद्र दिल्याने उमेदवारांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

राज्य शासनाच्या महसूल विभागांतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील पदाच्या परीक्षा केंद्रासाठी परतूर - राज्य शासनाच्या महसूल विभागांतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील पदाच्या परीक्षा केंद्रासाठी उमेदवाराने दिलेल्या तीन पर्याय सोडून चौथेच केंद्र दिल्याने उमेदवारांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. राज्य शासनाच्या महसूल विभागांतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील ही मोठी भरती आहे.

४ हजार ६४४ पदांच्या तलाठी भरतीसाठी तब्बल १० लाख ४१ हजार ७१३ उमेदवारांनी अर्ज केले आहे. त्यातील पुणे जिल्ह्यात सर्वाधिक तर सर्वात कमी अर्ज वाशीम जिल्ह्यात उमेदवारांनी अर्ज केले. शुल्कापोटी कंपनीकडे १० कोटी रुपयांची रक्कम जमा झाली.

एवढी रक्कम जमा होऊन उमेदवाराच्या मागणीप्रमाणे परीक्षा केंद्राचे नियोजन केले नसल्याचे दिसून आले.भूमि अभिलेख कार्यालयातील जमावबंदी आयुक्त आणि संचालक यांच्याकडून राज्यभरातील ३६ जिल्ह्यांमधील विविध केंद्रांवर ऑनलाइन परीक्षा घेण्यात येणार आहे.त्यासाठी एका कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे.

परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी तीन परीक्षा केंद्राचे पर्याय दिले होते मात्र कंपनीने ते केंद्र न देता चौथे केंद्र देऊन परीक्षार्थींना त्रास देण्याचा प्रयत्न केला.गेली तीन वर्षे कोरोनामुळे भरती रखडली. त्यामुळे यंदाची भरती निघाल्यानंतर परीक्षेची तयारी केलेल्या उमेदवाराला आशेचा किरण निर्माण झाला.

राज्य आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाची तयारी करणारे उमेदवारही यामध्ये आता मोठ्या प्रमाणावर उतरले असताना त्यामध्ये नको ते परीक्षा केंद्र देऊन परीक्षार्थींना केंद्र शोधणे आणि त्या परीक्षेला जाणे यामध्ये मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागणार आहे याचा विचार कंपनीने केला नाही.

मी स्पर्धा परीक्षा अनेक दिवसांपासून अभ्यास करतो, खूप दिवसांनंतर तलाठी भरती निघाल्याने मी अर्ज केला. परंतु मी निवडलेले परीक्षा केंद्र सोडून मला अमरावती येथील परीक्षा केंद्र मिळाले आहे. त्यामुळे अडचणी वाढत आहेत.

- ऋषी कऱ्हाळे, परीक्षार्थी,परतूर

गेल्या अनेक वर्षापासून शासकीय भरती नव्हती. यंदा भरती निघाली म्हणून मी अर्ज केला अर्जामध्ये जालना,छत्रपती संभाजी नगर, नांदेड या परीक्षा केंद्राचा पर्याय दिला होता, परंतु मला वर्धा परीक्षा केंद्र मागणी केलेली नसताना दिले, आता त्या ठिकाणी जाणे व परीक्षा केंद्र शोधणे हे मला अडचणीचे ठरणार आहे.

- शंतनू कपाळे, परीक्षार्थी,परतूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT