Talni to Waghala Road potholes Talni to Waghala Road potholes
मराठवाडा

Talni to Waghala Road : खराब रस्त्यांमुळे शाळकरी मुलांचे हाल

Talni to Waghala Road : तळणी ते वाघाळा मार्गावरील खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहने अडकली, विद्यार्थ्यांनी पाण्यात उतरून वाहने लोटून बाहेर काढली.

सकाळ वृत्तसेवा

तळणी - तळणी ते वाघाळा रस्त्यावर शाळेय विद्यार्थ्यांच्या गाड्या ह्या पाणी असलेल्या खड्यात अडकल्या होत्या. विद्यार्थ्यांनी त्या गाड्या पाण्यात ऊतरून लोटत बाहेर काढल्या. ही घटना गुरुवार (ता. १ ) रोजी तळणी ते वाघाळा रस्त्यावर टाकळखोपा गावात सकाळी साडे नऊ वाजेच्या दरम्यान घडली. मंठा तालुक्यात तळणी सर्कल मधील इंचा टाकळखोपा, वाघाळा रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत.

त्या खड्डयात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. त्यामुळे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. गुरुवारी सकाळी तीन ते चार गाड्या मधुन तीस पस्तीस विद्यार्थी शाळेसाठी निघाले होते. परंतु विद्यार्थ्यांची वाहने रस्त्यात बंद पडली. त्यामुळे विद्यार्थी व विद्यार्थिनींनी मिळून ही बंद पडलेली वाहने लोटत खड्डया बाहेर काढली.

काही विद्यार्थ्यांची घटक चाचणी परीक्षा देखील होती. शेगाव ते पंढरपुर दिंडी महामार्गावर पुर्णा पाटीवरून तळणी ते वाघाळा जाण्यासाठी रस्ता आहे. हे अंतर सहा ते सात किलोमीटर आहे परंतू या मार्गावर भले मोठ मोठे खड्डे पडले आहेत.

अनेक ठिकाणी गुडघाभर खोल खड्डे पडले आहेत. त्यामुळे ह्या मार्गावरून जाण्यासाठी या परिसरातील गामस्थांना, विद्यार्थ्यांना,तसेच बाहेर गावावरून येणाऱ्या पाहुण्यांना खुप त्रास सहन करावा लागतो. खराब रस्त्यामुळे या मार्गावरून एस टी देखील जात नाही. या गावात जाण्यासाठी पायी चालणे देखील अवघड आहे. खड्डयात साचलेल्या पाण्यामुळे खड्डा किती खोल आहे. याचा अंदाज येत नाही .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Konkan Railway: कोकण रेल्वेचा मोठा बदल! आता पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून धावणार गाड्या; नवा मार्ग कसा आहे? जाणून घ्या...

Stock Market Holiday: 3 एप्रिलला शेअर बाजार बंद? सलग 3 दिवस बाजार बंद राहणार! जाणून घ्या अपडेट

Latest Marathi News Live Update: मंगळवेढ्यात फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

Sinhgad Road News : वादळी वाऱ्यात झाड पडल्याने ज्येष्ठ महिलेचा मृत्यू

IPL 2026 Marathi News : युवराज सिंग SRH मालकीण काव्या मारनवर नाराज; म्हणाला, अभिषेक शर्माने फ्रँचायझीसाठी ७ वर्ष घासली...

SCROLL FOR NEXT