Murderer Attack esakal
मराठवाडा

Sengaon Crime : अज्ञाताकडून कोयत्याने केलेल्या प्राणघातक हल्लात शिक्षक गंभीर जखमी

सेनगाव शहरातील एका शिक्षकावर अज्ञाताकडून कोयत्याने प्राणघातक हल्ला गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी घडली.

विठ्ठल देशमुख

सेनगाव - शहरातील एका शिक्षकावर अज्ञाताकडून कोयत्याने प्राणघातक हल्ला गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (ता. १९) सायंकाळीच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे.

सेनगाव येथील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक मारोती कोटकर यांच्यावर अज्ञाताने कोयत्याने वार करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सायंकाळी घडली आहे. कोटकर हे नेहमीप्रमाणे बाहेर काही निमित्त जात असताना एका दुचाकीवरून दोन अज्ञात व्यक्ती आले आणि त्यातील एकाने कोयता काढून कुठलीही विचारणा न करता कोटकर यांच्या शरीरावर सपासप वार केल्याचे त्यांच्या कुटुंबीयाकडून सांगण्यात येत आहे. त्यांच्या डोळ्याजवळ, पोटावर, आणि डाव्या हातावर कोयत्याने हल्ला केल्यानंतर त्यांनी आरडाओरडा सुरू केला होता.

त्यांनंतर परिसरातील काही तरुणांनी घटनास्थळी धाव घेऊन कोयता घेऊन वार करणाऱ्या व्यक्तीला पकडण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, दुचाकीवरून एक जण फरार झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्याची माहिती स्थानिक नागरिकानी दिली आहे.

काही तरुणांनी कोटकर यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले मात्र गंभीर जखमी असल्यामुळे त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करून पुढील उपचारासाठी हिंगोली येथे जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

या घटनेमुळे सेनगाव शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. संबंधित आरोपीना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांतून केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane Traffic: घोडबंदर मार्ग 6 तास पाण्याखाली, चालकांचा वाहतूक कोंडीसोबत सामना; ठाणेकरांचे हाल

Latest Marathi News Live Updates: अमळनेरात पुराचा कहर; एकाचा मृत्यू, २४ तासांनंतरही शोध निष्फळ

प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरण! संशयित आरोपी मनीषा मुसळे माने यांचा दोषमुक्त करण्याचा न्यायालयाकडे अर्ज, अर्जात नेमके काय? वाचा...

Mumbai News: मुंबईत घर घेणं महागलं! नागरिकांच्या खिशाला फटका, 'इतक्या' टक्क्यांनी किमतीत वाढ, अहवाल समोर

सोहम बांदेकर अडकणार लग्नबंधनात! 'ही' मराठी अभिनेत्री होणार आदेश अन् सुचित्रा बांदेकरांची सून?

SCROLL FOR NEXT