file photo
file photo 
मराठवाडा

तंत्रज्ञानाचा उपयोग गरीब रुग्णांसाठी व्हावा - पद्मश्री डॉ. लहाने

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : वैद्यकीय क्षेत्रात अनेक नवीन तंत्रज्ञान विकसित झाले आहे. हे रुग्णांना उपचारासाठी खूपच उपयुक्त ठरत आहे. पण याचा उपयोग गरीब आणि ग्रामीण भागातील लोकांसाठीही व्हावा यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी केले. नांदेड येथे आयोजित मराठवाडा नेत्रतज्ज्ञ परिषदेत अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाचे उदघाटन आरोग्य विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी केले.

व्यासपीठावर डॉ. विलास वांगीकर, डॉ. रागिणी पारेख, अधिष्ठाता डॉ. सी. बी. म्हस्के, जळगाव येथील अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. श्याम तेलंग, सचिव डॉ. विवेक मोतेवार, मराठवाडा अध्यक्ष डॉ. किशन लखमावार, डॉ. विवेक सहस्रबुद्धे, डॉ. सुजाता जोशी पाटोदेकर, डॉ. स्मिता म्हैसेकर, डॉ. दीपक पांपटवार आदींची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते धन्वंतरीपूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. उद्‌घाटक कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी परिषदेचे भव्य आणि काटेकोरपणे नियोजन केल्याबद्दल संयोजकांचे कौतुक केले.

तज्ज्ञांची व्याख्याने, चर्चासत्रे 

संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ श्याम तेलंग,मराठवाडा नेत्रतज्ज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ. किशन लखमावार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमचे नेटके संचलन डॉ. सुजाता जोशी पाटोदेकर यांनी केले, तर आभारप्रदर्शन डॉ विवेक मोतेवार यांनी मानले. दोन दिवस चाललेल्या या नेत्रतज्ज्ञांच्या परिषदेत डोळ्यांच्या विविध आजारावर उपयुक्त असणाऱ्या आधुनिक उपचार पद्धतीवर मुंबई, हैदराबाद, पुणे आणि मराठवाड्यातील अनेक तज्ज्ञांची व्याख्याने, चर्चासत्रे संपन्न झाली. काही शोधनिबंधही सादर करण्यातआले. तसेच अचानक हृदय बंद पडलेल्या रुग्णांना तातडीचे उपचार करण्यासाठीचे प्रात्यक्षिक नांदेड अनेस्थेसिया टीमने सादर केले. या निमित्ताने "आईलाइट" या डॉ.सुजाता जोशी पाटोदेकर यांनी संपादन केलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यातआले.

साडेचारशे नेत्रतज्ज्ञ डॉक्टरांचा सहभाग

विशेष बाब म्हणजे या विभागीय परिषदेत औरंगाबाद येथील माजी विभागप्रमुख डॉ. विलास वांगीकर, नांदेड येथील जेष्ठ नेत्रतज्ज्ञ डॉ. आर.व्ही. पाटील, डॉ. एस.व्ही. सुभेदार, डॉ. विश्वास देशमुख यांना रुग्णसेवेतील प्रदीर्घ योगदानाबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून गौरविण्यात आले. दि 4 व 5 जानेवारी असे दोन दिवस भरगच्च वैज्ञानिक कार्यक्रम संपन्न असलेल्या या परिषदेत मुंबई, हैदराबाद, पुणे, नगर यासह मराठवाड्यातील साडेचारशे नेत्रतज्ज्ञ डॉक्टरांनी सक्रिय सहभाग घेतला.

यांनी घेतले परिश्रम

परिषदेच्या यशस्वीतेसाठी डॉ. किशोर विडेकर, डॉ. संतोष शिरशीकर, डॉ. वैभव दासरवार, डॉ. सोहेल खान, डॉ. गिरीश देशमुख, डॉ. आनंद पाटील, डॉ. पंकज जोशी, डॉ. अजय बुरांडे, डॉ. चंद्रशेखर अप्पनगिरे, डॉ. टी. ए. माने, डॉ. प्रमोद गट्टाणी, डॉ. रवी अग्रवाल, डॉ. दिलीप कंधारे, डॉ. स्मिता टेंगसे, डॉ. विभूते, डॉ. ज्ञानेश्वर पेनसलवार, डॉ. उदय नाईक, डॉ. प्रदीप डहाळे, डॉ. अमित पेडगावकर, डॉ. सचिन रेड्डी, डॉ. निखिल सुभेदार, डॉ. नंदिनी शर्मा, डॉ. विशाल कुलकर्णी, डॉ. शीतल नाईक, हरिष देसाई आदींनी परिश्रम घेतले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: अजित पवार अन् शरद पवार लग्न सोहळ्यानिमित्त एकत्र

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : राजस्थान क्वालिफाय करणार की हैदराबाद मजबूत स्थितीत पोहचणार?

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

PPF : दररोज 250 रुपये वाचवून तयार होईल 24 लाखांचा फंड, कसा ते वाचा ?

SCROLL FOR NEXT