हिंगोली ः ‘व्हॅलेंटाईन डे’ निमित्त शहरातील गिफ्ट सेंटरवर विविध वस्‍तु विक्रीस उपलब्ध झाल्या आहेत.  
मराठवाडा

प्रेम भावना व्यक्त करण्यासाठी तरुणाई आसूसलेली 

राजेश दारव्हेकर

हिंगोली ः ‘व्‍हॅलेंटाईन डे’ हा प्रेमाचे प्रतिक म्‍हणून शुक्रवारी (ता.१४) साजरा केल्या जाणार असल्याने या दिवसानिमित्त एकमेंकाना सेलीब्रेट करण्यासाठी तरुणाई सज्‍ज झाली असून शहरातील विविध गिफ्ट सेंटर मित्र मैत्रिणीला सरप्राईज देण्यासाठी भेट वस्‍तु खरेदीला करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. 

‘व्हॅलेंटाईन डे’ हा प्रेमाचे प्रतिक म्‍हणून साजरा केला जातो. अनेक वर्षापुर्वी रोममध्ये तत्‍कालीन राज्‍यकर्त्यांनी सैनिकांनी विवाह करू नये, असा आदेश काढला होता. त्‍यावेळी सेंट व्हॅलेंटाईन यांनी हा आदेश धुडकावत सैनिकांचे प्रेमविवाह लावून दिले होते. त्‍यामुळे व्हॅलेंटाईनला चौदा फेबुवारीला मृत्‍युदंडाची शिक्षा देण्यात आली. त्‍यांच्या आठवणीला उजाळा म्‍हणून हा दिवस प्रेमाचे प्रतीक म्‍हणून पाश्चात्य देशात साजरा केला जातो. 

प्रेमाचा सप्ताह केला जातोय साजरा
मागच्या काही वर्षांपासून आपल्या देशात देखील तरुणाई व्हॅलेंटाईन वीक साजरा करीत आहेत. यात चॉकेलेट डे, प्रॉमीस डे आदी दिवस साजरे करून चौदा फेब्रुवारीला ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा केला जाणार आहे.

गिफ्ट सेंटरवर युवकांची गर्दी
मैत्रीचे नाते निर्माण व घट्ट करणारा ‘फ्रेंडशीप डे’ एका दिवसावर आल्याने तरुणाईत उत्‍साहाचे वातावरण आहे. या दिवशी मित्र, मैत्रिणीला गिफ्ट देऊन हा दिवस सेलीब्रेट करण्यासाठी तरुणाई सज्‍ज झाली आहे. ‘व्हॅलेंटाईन डे’ च्या पार्श्वभूमीवर शहरातील गिफ्ट सेंटरवर विविध वस्‍तु विक्रीस आल्या आहेत. युवकांतुन लव्हस्‍टोरी, बुक, ग्रिटींग कार्ड, फोटोफ्रेम, म्‍युझीक सीडी, टेडीबेअरला मोठी मागणी होत आहे. ते पन्नास रुपयांपासून ते पाचशे रुपयापर्यंत विक्रीस उपलब्ध झाले आहेत. 

या वस्तूंना मागणी
थ्रीडी ग्रिटींग कार्ड, बुकलेटसह प्रेमाचा संदेश देणारे मेसेज कप, विविध नामांकीत कंपन्यांची चॉकलेटस, सुगंधी कॅडल्‍स अशा वस्‍तुंचा यात समावेश आहे. पाचशे रुपयांपासून ते एक हजार रुपयापर्यंत त्‍या उपलब्ध होत असल्याचे विक्रेते सांगत आहेत.  

प्रेमाचे प्रतिक म्‍हणून दिवस करावा साजरा
प्रेमाचे प्रतिक म्‍हणून हा दिवस साजरा केला जातो. त्‍यामुळे या दिवसाचे महत्‍व वेगळे आहे. मित्र मैत्रिणीवर प्रेम करण्याचा दिवस असा मर्यादित अर्थ काढला जातो. मात्र, असा मर्यादित अर्थ न करता आई, वडील, भाऊ, बहीण, गुरूजन मित्र मैत्रिणीवर प्रेम करण्याचे प्रतिक म्‍हणून हा दिवस साजरा केला जातो. त्‍यामुळे या दिवसाचे महत्‍व विशेष आहे. -श्रीकांत मोरे, युवक.  

दिवस साजरा करणे काही चुकीचे नाही
व्हॅलेंटाईन डे प्रत्‍येकाने साजरा करायला हवा. दोन मनामधील भावना व्यक्‍त करणारा हा दिवस आहे. विशेष महत्‍व असल्याने प्रेमाचे महत्‍व वाढविणारा हा दिवस साजरा करण्यात काही चुकीचे नाही. - सचिन देशमुख, युवक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: सतर्कतेचा इशारा! महाराष्ट्रात पुढील ५ दिवस मुसळधार पावसाचा धोका; पण कुठे? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट

'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेमुळे सुखदा खांडकेकरला ऐकावे लागलेले टोमणे; मग अभिनेत्रीने ठरवून घेतला तो निर्णय

Pune Traffic Alert: आषाढी वारी पालखी आगमनादिवशी पुण्यात पालखी मार्गावरील वाहतूक तीन टप्प्यांत बंद

Manchar Rain Update : आहुपेत ४०७ मिमी, भीमाशंकरमध्ये २९७ मिमी पाऊस; डिंभे धरणाच्या पाणीसाठ्यात एका दिवसात मोठी वाढ

Ambegaon Heavy Rain : आंबेगाव तालुक्याच्या पुर्व भागातील गावांना मुसळधार पावसाने झोडपून काढले; ओढ्या, नाल्यांना पुर, शेतात रस्त्यावर पाणीच पाणी

SCROLL FOR NEXT