Accident esakal
मराठवाडा

Sillod Accident News : तहसीलदारांच्या वाहनाला अपघात; तीन कर्मचारी गंभीर जखमी, जळगाव मार्गावरील घटना

छत्रपती संभाजीनगर ते जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील केऱ्हाळा फाट्यालगत बोलेरो जीप व हायवा टिप्परच्या अपघातात जीपमधील तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी (ता.२१) साडेआठ वाजेच्या सुमारास घडली.

सकाळ वृत्तसेवा

सिल्लोड: छत्रपती संभाजीनगर ते जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील केऱ्हाळा फाट्यालगत बोलेरो जीप व हायवा टिप्परच्या अपघातात जीपमधील तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी (ता.२१) साडेआठ वाजेच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार सिल्लोड तहसीलदारांचे वाहन बोलेरा जीपमधून (क्र.एमएच-२०.जीके-९०६८) चालकासह तिघे छत्रपती संभाजीनगर येथून सिल्लोडला येत होते. जळगाव मार्गावरील केऱ्हाळा फाट्यालगत असलेल्या कुणाल पेट्रोल पंपालगत हायवा टिप्पर (क्र.एमएच-१४.सीयु-०८८०) आणि बोलेरो यांच्यात जोरदार धडक झाली.

यामध्ये जीपमधील चालक कय्यूम देशमुख (वय ५७), राजू बसैय्ये (वय ३२), शेख वसीम (वय २३) गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने सिल्लोड येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनास्थळी वडोद बाजार (ता.फुलंब्री) पोलिसांनी धाव घेत वाहने बाजूला करून रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली. रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात नोंद घेण्याची प्रक्रिया सुरु होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा Ee Sala Cup Namde! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश; गुजरात टायटन्सचा लाजीरवाणा पराभव

BJP Government: भाजप सरकार देणार पाच रुपयांमध्ये मासे-भात भोजन; महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेची घोषणा

Sholay Style Agitation : पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइलने आंदोलन; जलजीवन योजनेचे पाणी घरापर्यंत पोहोचत नसल्याने केला निषेध

Ambad Rajasthani Women: अंबडमध्ये राजस्थानी महिला मंडळाचा ‘धोंडा रो आगमन’ सोहळा; दीडशे लेकींचा पारंपरिक धोंडे जेवण, आहेर व भेटवस्तूंनी सन्मान

Sakoli Murder Case: गडकुंभली तलाव हत्याकांड उघड: निखिल कांबळे खूनप्रकरणी आरोपी जेरबंद, तलावातून धारदार चाकू व दगड जप्त

SCROLL FOR NEXT