tempo and tractor accident 10 person injured hospitalized dharashiv police  Sakal
मराठवाडा

Dharashiv Accident News : वराडी टेम्पो व ट्रॅक्टरची समोरासमोर धडक होऊन दहा जखमी

वराडी टेम्पो व ट्रॅक्टरची समोरासमोर धडक होऊन दहा जन जखमी झाले आहेत. टेम्पो व ट्रॅक्टर चालकासह तिघांची प्रकृती गंभीर असून सर्व जखमींना पुढील उपचारासाठी धाराशिव येथे पाठविण्यात आले आहे.

सुधीर कोरे

जेवळी : वराडी टेम्पो व ट्रॅक्टरची समोरासमोर धडक होऊन दहा जन जखमी झाले आहेत. टेम्पो व ट्रॅक्टर चालकासह तिघांची प्रकृती गंभीर असून सर्व जखमींना पुढील उपचारासाठी धाराशिव येथे पाठविण्यात आले आहे. हा अपघात जेवळी (ता लोहारा) येथे शनिवारी (ता.२०) अकराच्या सुमारास घडला आहे.

या बाबत माहिती अशी की, तोरंबा टाकी (ता. धाराशिव) येथील लग्नासाठी मुलीकडील वराड हे शनिवारी (ता.२०) टेम्पो, छोटा अशोक लेलँडने (क्र एम.एच २५, एक.जे ४०८०) जेवळी (ता. लोहारा) मार्गे मुरुम (ता. उमरगा) येथे जात होते.

सकाळी साडे अकराच्या सुमारास आष्टा मोड- लोहारा मार्गावरील जेवळी येथील हॉटेल समृद्धी धाब्याजवळ आले असता जेवळीहून हिप्परगा सय्यद गावाकडे जाणाऱ्या भरधाव ट्रॅक्टरला (नंबर प्लेट नाही) समोरासमोर जोरदार धडक बसली.

या अपघातात टेम्पो, ट्रॅक्टर ड्रायव्हर व मुलीकडील नातेवाईकसह दहा जण जखमी झाले आहेत. यात टेम्पो ड्रायव्हर किशोर अंकुश कदम (वय २४) केबिन मध्ये बसलेले भारत भगवान शिंदे (वय ४५) दोघे (तोंरबा टाकी) तसेच ट्रॅक्टर ड्रायव्हर

आकाश धनसिंग जाधव (वय ३५, जेवळी पूर्व तांडा) हे गंभीर जखमी झाले आहेत. यांना पुढील उपचारासाठी अंबुलन्सने धाराशिला पाठवण्यात आले आहे. तर यात लग्न वराडी हरिदास श्रीहरी लोखंडे (वय ४५) श्रीहरी देवराव ढोले (वय ५५),

जयश्री रावसाहेब मुळे (वय ४२), रामेश्वर साधू गायकवाड (वय ३५), नवनाथ भारत लोखंडे (वय २४), सुहास उत्तरेश्वर लोखंडे (वय १५) हे सर्व राहणार तोरंबा टाकी व अविनाश धैरशील पाटील (वय ३५, रातंजन बार्शी) या सर्व जखमींना जेवळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी धाराशिव येथे पाठवण्यात आल्याची माहिती येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश मुंडे यांनी दिले आहे.

घटनेची माहिती मिळताच लोहारा पोलीस ठाण्याचे फोजदार सचिन केंद्रे व बीट अंमलदार कांतू राठोड हे घटनास्थळी दाखल होत पंचनामा उरकून पुढील तपास चालू केला आहे. या जखमीत नवरी मुलीचे चुलते, चुलती, मामा आदींचा यांचा समावेश आहे. या अपघातानंतर जेवळी येथील नागरिक अपघात स्थळी दाखल होत सर्जव खमीना पुढील उपचारासाठी पाठवण्याची व्यवस्था केली. यावेळी अपघातानंतर मात्र टेम्पो मधील वराडी मंडळींना लग्नाला जाता आलं नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

PM Narendra Modi: भारतासाठी आकाशही ठेंगणे; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्‌गार

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

Ashadi Wari 2025: पंढरीची वारी पोचली लंडनच्या दारी!विठ्ठल-रुक्मिणीच्या पादुकांसह २२ देशांतून ७० दिवसांचा प्रवास

SCROLL FOR NEXT