NND24KJP02.jpg 
मराठवाडा

दहा तासाची मेहनत अन् १९ गावांना दिलासा

कृष्णा जोमेगावकर

नांदेड : अज्ञात इसमाने पेटवून दिलेले वडाचे झाड वीज तारांवर कोसळून देगलूर ग्रामीण उपविभागांतर्गत येणाऱ्या ३३ केव्ही तमलूर व ३३ केव्ही शाहपूर उपकेंद्राचा वीजपुरवठा खंडीत होवून १९ गावांना विजेविना रहावे लागले. मात्र महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी समर्थपणे निर्माण झालेल्या परिस्थितीला तोंड देत थोडीशीही उसंत न घेता १० तासात १९ गावांचा वीजपुरवठा सुरळीत करत पाच हजार वीजग्राहकांना दिलासा दिला.

जनमित्र सदैय तत्पर
सध्या राज्यात 'लॉकडाऊन'ची स्थिती विदारक असतानाही महावितरणचे कर्मचारी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सजगपणे कार्यरत आहेत. कुठे अवकाळी व वादळी पावसाला तोंड देत तर कुठे मानवनिर्मित कारस्थानामुळे उदभवलेल्या परिस्थितीला लढवैय्ये जनमित्र वीजयंत्रणेला फटका बसून वीजग्राहक अंधारात राहू नये यासाठी सदैव तत्पर आहेत. 

वडाच्या झाडाला लावली आग
मंगळवारी (ता. २१) सायंकाळी साडेसहा वाजता ३३ केव्ही वीजवाहिनीच्या जवळ रस्त्याच्या कडेला असलेले वडाचे झाड अज्ञात इसमाने पेटवून दिल्याचे कळाले. उपकार्यकारी अभियंता श्री विजय गारगोटे यांनी तत्काळ तहसीलदार व अग्निशमनला याबाबत  कळवले. वीजयंत्रणेला काही नुकसान होवू नये म्हणून वीजपुरवठा खंडीत करून झाडाची आग विझवून टाकली. 

परत त्याच झाडाला आग
मात्र रात्री साडेदहा वाजता परत त्याच झाडाला कोणीतरी आग लावल्यामुळे झाड जळून ३३ केव्ही वीजवाहिनीवर तूटून पडले. त्यामुळे वीज वाहिनी व एक सिमेंटचा पोल तुटून पडला. परिणामी ३३ केव्ही तमलूर व ३३ केव्ही शाहपूर उपकेंद्रा अंतर्गत येणाऱ्या तमलूर, शाहपूर, नरंगल,आलूर, सांगवी, शेलगाव व चैनपूर गावासह १९ गावांचा वीजपुरवठा खंडीत झाला होता.

दहा तासात विजपुरवठा पुर्ववत
महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी क्षणाचीही उसंत न घेता दुरूस्तीच्या समानाची जुळवाजूळव करत लगेचच दुरूस्तीला सुरवात केली. बुधवारी सकाळी ८ वाजून ५० मिनीटाला दोन्ही उपकेंद्राचा वीजपुरवठा पुर्ववत करण्यात यश मिळाले. महावितरणच्या देलूर गामीण उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता श्री विजय गारगोटे यांनी क्षणाचीही उसंत न घेता खंडीत झालेला वीजपुरवठा पुर्ववत करण्यासाठी सहायक अभियंता श्री नरेंद्र टकले, त्याचबरोबर जनमित्र श्री वाघमारे, श्री यन्नावार, शेख, श्री ताठे तसेच श्री भगदकर यांच्यासह परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT