mid day meal
mid day meal sakal
मराठवाडा

पन्नास किलोमागे दहा किलोंची तूट,शालेय पोषण आहारात पुरवठादारांकडून फसवणूक

सकाळ वृत्तसेवा

हेर (जि.लातूर) : शासनाकडून पुरवठा करण्यात येत असलेल्या शालेय पोषण आहारात प्रत्येक पन्नास किलो सीलबंद धान्याच्या पोत्यात दहा ते बारा किलो धान्य कमी भरत असल्याचा प्रकार येथे उघडकीस आला. यामुळे संबंधित पुरवठादारांकडून शासनाची फसवणूक होत असल्याचे उघड झाले आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व संस्थेमधील प्रत्येक विद्यार्थ्यास शासनाच्या धोरणानुसार रोज शंभर ग्रॅम शालेय पोषण आहार (Mid Day Meal) दिला जातो. परंतु, वितरण व्यवस्था योग्य वितरण करताना दिसत नाही. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बामाजीचीवाडी, जंगमवाडी,जयाबायचीवाडी येथे शालेय पोषण आहाराची दोनशे किलो मागणी होती. पुरवठादाराने दोनशे किलो पुरवठा केला. पण, नंतर ग्रामस्थ आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांनी मंगळवारी (ता. २२) पुरवठा केलेल्या पोत्यांचे वजन केले. मात्र, पन्नास किलोच्या बंद पोत्यात केवळ ३८ ते ४० किलोच धान्य भरले. त्यामुळे पोषण आहारात घोटाळा होत असल्याचे उघड झाले आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने (Latur) लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. (Ten Kilograms Deference In 50 Kg, Fraud In Mid Day Meal By Suppliers In Latur)

कारवाई काय होणार?

पुरवठादाराने कमी धान्य देऊन शासनाची फसवणूक केली. त्यामुळे त्याच्यावर काय कारवाई होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

शाळांना पोषण आहार सीलबंद पोत्यात मिळतो. त्यामुळे मुख्याध्यापक त्याचे वजन करण्याच्या भानगडीत पडत नाहीत. मुख्याध्यापकांनी वजन करूनच पोती घ्यावीत. पुरवठादाराने दिलेल्या छापील बिलावर सही न करता प्रत्यक्ष वजन लिहूनच सही करावी.

- मुन्ना सूर्यकर, अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती, हेर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Laughter Day 2024 : हसा लोकांनो हसा! तणाव,हृदयविकाराची करायचीय सुट्टी तर फक्त हसा, हसण्याचे ढिगभर फायदे

IPL 2024, RCB vs GT: विराटचा जबरदस्त डायरेक्ट थ्रो, तर विजयकुमारचा सूर मारत भन्नाट कॅच, पाहा Video

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य (०५ मे २०२४ ते ११ मे २०२४)

Latest Marathi News Live Update : प्रचाराचा आज सुपरसंडे, तोफा थंडावणार; जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी

Sakal Podcast : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला ते रावेरमध्ये लोकसभेत कोण बाजी मारणार?

SCROLL FOR NEXT