Latur Corona News
Latur Corona News 
मराठवाडा

Breaking : लातूरकरांना धक्का ! १० कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळले

सुशांत सांगवे

लातूर : लातूर जिल्ह्यातील दहा कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आल्यामुळे कोरोनाबाधितांची जिल्ह्यातील संख्या सोमवारी (ता.२५) कमी झाली. पण, दुसऱ्याच दिवशी मंगळवारी (ता.२६) लातूर जिल्ह्यात आणखी दहा नवे कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. यात लातूर आणि उदगीरमधील प्रत्येकी दोन, तर निलंगा येथील सहा जणांचा समावेश आहे. दरम्यान, लातूरमध्ये आढळून आलेला एक रुग्ण हा नुकताच दिल्लीहून तर दुसरा मुंबईहून लातूरात आल्याचे स्पष्ट झाले आहे.


विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत लातूर जिल्ह्यातील एकुण ८२ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी सोमवारी (ता. २५) आले होते. त्यातील ६३ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असून १९ व्यक्तींचे अहवाल  प्रलंबित होते. या १९ पैकी १० जणांचे अहवाल मंगळवारी (ता.२६) दुपारी पॉझिटिव्ह आले. उर्वरित तीन व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर पाच व्यक्तींचे अहवाल अंतिम आले नाहीत. एकाचा अहवाल रद्द करण्यात आला आहे.


संस्थेतील विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर म्हणाले, संस्थेतील आठ व्यक्तींचे अहवाल प्रलंबित होते. त्यापैकी दोन व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून तीन व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. दोन व्यक्तींचे अहवाल अंतिम आले नाहीत तर एका व्यक्तीचा स्वॅब परिपूर्ण न आल्यामुळे अहवाल रद्द करण्यात आला आहे. उदगीर येथील पाच व्यक्तींचे अहवाल प्रलंबित होते. त्यापैकी दोन व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून तिघांचे अहवाल अंतिम आले नाहीत. निलंगा येथील सहा व्यक्तींचे अहवाल प्रलंबित होते. त्यापैकी सर्वच सहा व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान, १० नव्या पॉझिटिव्ह रूग्णांमुळे लातूर जिल्ह्यातील एकुण बाधितांची संख्या १०४ झाली आहे. यातील ५५ जणांवर उपचार सुरू आहेत. तर ४६ जण बरे झाले असल्याने त्यांनी घरी सोडण्यात आले आहे. उपचारादरम्यान तिघांचा मृत्यू झाला आहे.


आणखी एका गावाची भर
रस्ते अडवलेले असताना आणि गावागावांत ॲन्टी कोरोना फोर्स नेमलेली असतानाही लातूर जिल्ह्यात आत्तापर्यंत १६ गावांत कोरोनाचा शिरकाव झाला आहे. त्यात आता आणखी एका नव्या गावाची भर पडली आहे. लातूर तालूक्यातील मसला गावात कोरोनाचा एक रूग्ण आढळून आला आहे. तो दिल्लीहून काही दिवसांपूर्वी लातूरात आला आहे. तो ‘क्वारंटाईन’मध्ये होता. लातूरात आढळून आलेला दुसरा रूग्ण हा मुंबईहून आलेल्या कुटुबांतील सदस्य आहे. हे कुटूंब लातूरातील एमआयडीसी भागातील हडको कॉलनीतील आहे. या कुटूंबात याआधी पाच जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

कोरोना मीटर
एकुण बाधीत : १०४
उपचार सुरू : ५५
बरे झालेले : ४६
मृत्यू : ०३

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT