Bidkin sakal
मराठवाडा

Bidkin : बिडकीन व्हॅरॉक कंपनीच्या बाजूला रिक्षांमधे ४३ वर्षीय इसमाचा आढळला मृतदेह,पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद

Bidkin : बिडकीन चितेगाव रोडवरील व्हॅरॉक कंपनीच्या बाजूला ४३ वर्षीय इसमाचा मृतदेह रिक्षामध्ये आढळल्याची घटना घडली आहे. बिडकीन पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

(रविंद्र गायकवाड)

बिडकीन : बिडकीन चितेगाव रोडवर असलेल्या व्हॅरॉक कंपनीच्या बाजूला रिक्षांमधे ४३ वर्षीय इसमाचा मृतदेह आढळला असून बिडकीन पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.

सदरील घटनेची घटनास्थळावरून मिळालेली प्राथमिक माहिती अशी की तालुक्यातील बिडकीन पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या बिडकीन चितेगाव रोडवर व्हॅरॉक कंपनीच्या बाजूला एम एच २० ई के २५१८ क्रमांकाच्या रिक्षा मधे रिक्षा चालक विनोद वामनराव मैंद वय वर्ष ४३ रा.केंब्रिज शाळे समोर,सुंदरवाडी.छत्रपती संभाजी नगर हा इसम दिनांक १४ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी साधारण ४ वाजे दरम्यान रिक्षामध्ये बेशुद्ध अवस्थेत दिसून आला.

सदरील घटनेची बिडकीन पोलिसाना माहिती देताच तत्काळ पोलिसांच्या तसेच नागरिकांच्या मदतीने बेशुद्ध अवस्थेत असलेल्या तरुणास बिडकीन येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून मयत घोषित केले.

वैद्यकीय अधिकारी यांनी सदरील घटनेची बिडकीन पोलिसाना दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली असून बिडकीन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील घटनेचा पुढील तपास संदिप धनेधर हे करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : डोकेदुखी वाढणार?अंतरवालीतील महिलेचा पोलिसांत मोठा दावा,प्रकरण काय?

India Selection Committee: रोहित शर्माचा जवळचा मित्र घेणार अजित आगरकरची जागा? गुवाहाटीतील मिटिंगमधील अनुपस्थितीने चर्चेला उधाण

मुलाचं Instagram अकाउंट पालकांना थेट पाहता येतं का? Metaचे नियम काय?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावा लागणार का?

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह; सचिन सानप यांची हायकोर्टात धाव

SCROLL FOR NEXT