Bus Accident Sakal
मराठवाडा

चालत्या बसमध्ये चालकाला भोवळ आल्याने झाला अपघात

दहा वाहनाचा चुराडा : तीन जण जखमी

विनोद पाचपिल्ले

जिंतूर - बस चालकांस भोवळ आल्याने झालेल्या अपघातात दहा वाहनाचा चुराडा होऊन तीन जण जखमी झाल्याची घटना शहरातील अण्णाभाऊ साठे चौकात ता. १५ रोजी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास घडली. याबाबत वृत्त असे की, औरंगाबाद कळमनुरी (एम. एच. १३ सी.यु. ७५४३) ही बस सकाळी ११ वाजताच्या सुमारास कळमनुरीला जाण्यासाठी बस स्थानकातून निघाली. बस शहरातील अण्णाभाऊ साठे चौकात आल्यानंतर निळकंठ हॉटेल समोर बस चालकास अचानक भोवळ आली. त्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. नीलकंठ हॉटेल समोर उभ्या असलेल्या वाहनांवर जाऊन ही बस धडकली.

या अपघातात ७ मोटरसायकल, २ कार व एका सायकलवर जाऊन धडकल्याने या वाहनांचे मोठे नुकसान झाले. बसचा वेग कमी असला तरी चालकाला भोळ आल्यामुळे गाडी बसवरील नियंत्रण सुटले. व हॉटेल समोर असलेल्या एका गुलमोहोराच्या झाडावर जाऊन धडकल्याने बस थांबली. या अपघातात श्रुती गजानन तारे, तुळशीराम चंपक तारे, सुजाता श्रीकांत बोकसे हे बसमधील प्रवासी जखमी झाले. अपघातानंतर बस चालक दादाराव संभाजी धनवे व गाडीतील जखमींना जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या अपघातात कोणतीही सुदैवाने जीवित हानी झाली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT