beed sakal
मराठवाडा

Beed News : बिबट्याचा धुडगूस सुरूच ; शेतकरी सतर्क

बिबट्यास पकडण्यासाठी वनविभागाने मंगरूळ व सावरगाव अशा दोन ठिकाणी पिंजरे लावले असून, कर्मचारी देखिल गस्तीवर आहेत. परंतु, वनविभागास बिबट्या पकडण्यात अपयश येत आहे.

सकाळ वृत्तसेवा

माजलगाव : तालुक्यामध्ये मागील पंधरा दिवसांपासून बिबट्याचा धुडगुस सुरू असून, सावरगावात म्हशीच वगारू खाल्याची घटना नुकतीच उघडकीस आहे. या बिबट्यास पकडण्यासाठी वनविभागाने मंगरूळ व सावरगाव अशा दोन ठिकाणी पिंजरे लावले असून, कर्मचारी देखिल गस्तीवर आहेत. परंतु, वनविभागास बिबट्या पकडण्यात अपयश येत आहे.

तालुक्यातील रामपिंपळगाव, हिवरा, सावरगाव, मंगरूळसह धरण परिसरातील विविध गावांमध्ये बिबट्याचा संचार असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. तर, बिबट्याने शेतकऱ्यांच्या पशुधनावर हल्ला चढवत गाय, म्हैस, शेळ्या, मेंढ्या फस्त केल्या आहेत. बिबट्याच्या भीतीमुळे परिसरातील अनेक शेतकरी रात्री पिकांना पाणी देण्यासाठीही शेतात जात नाहीत. यामुळे पिके करपून नुकसान होत असून, बिबट्यास तत्काळ पकडावे, अशी मागणी जोर धरत आहे.

बिबट्यास पकडण्यासाठी वनविभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. मंगरूळ शिवारात एक पिंजरा लावल्यानंतर बिबट्याने सावरगाव परिसरात संचार केल्याने याठिकाणी देखिल दुसरा पिंजरा लावण्यात आला आहे. तसेच वनविभागाचे कर्मचारी सावरगावसह परिसरातील अन्य ठिकाणी बिबट्यास पकडण्यासाठी रात्रीची गस्त घालत आहेत. परंतु, बिबट्या पकडण्यास मात्र अपयशच येत आहे. त्यामुळे वनविभागाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण

माजलगाव धरण परिसरात पिण्यासाठी पाणी आणि लपण्यासाठी मोठ्या प्रमाणात उसाचे पीक असून, या परिसरातील गाव शिवारातच बिबट्याचा संचार आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अफवांचा पाऊस

धरण परिसरातील गाव शिवारात बिबट्या असून, या ठिकाणच्या अनेक गाय, शेळ्यांचा बिबट्याने फडशा पाडला आहे. परंतु, आता कधी या गावात तर कधी त्या गावात बिबट्या आल्याची अफवा सोशल मीडियावरून पसरविली जात आहे. अफवा पसरवू नका, असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.अफवांचा पाऊस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

Asia Cup Final: स्मृती मानधना - शफली वर्माचे तब्बल तीन वर्ल्ड रेकॉर्ड! भारताचे श्रीलंकेसमोर भलंमोठं लक्ष्य

SCROLL FOR NEXT