चोरलेल्या गायीसह वाहन फसले चिखलात sakal
मराठवाडा

रामनगर : चोरलेल्या गायीसह वाहन फसले चिखलात

चोरटे झाले फरार, भिलपुरी येथील प्रकार

सकाळ वृत्तसेवा

रामनगर : जालना तालुक्यातील भिलपुरी येथील एका शेतकऱ्याच्या गायी चोरून नेताना वाहन चिखलात फसल्यामुळे चोरट्यांना धूम ठोकावी लागली. ही घटना मंगळवारी (ता.१४) रात्री घडली. मौजपुरी ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक राकेश नेटके यांनी दिली.भिलपुरी येथील शेतकरी प्रकाश वसंतराव गोरे यांची पंचवीस हजार रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची गाय मंगळवारी (ता.१४) रात्री नेहमीप्रमाणे गावाशेजारील गोठ्यात बांधलेली होती.

दरम्यान मध्यरात्री चोरट्यांनी ही गाय चारचाकी वाहनात घालून चोरून नेण्याचा प्रयत्न केला. चोरटे मानेगाव मार्गाने जात असताना निरखेडा गावाजवळ वळण घेताना वाहन चिखलात फसले. वाहन काढण्याच्या प्रयत्नात असताना झालेल्या आवाजाने शेजारील ग्रामस्थ जागे झाले. ग्रामस्थांची चाहूल आणि वाहन चिखलातून निघत नसल्याचे चोरट्यांच्या लक्षात आले. त्यामुळे चोरट्यांनी गायीसह वाहन जागेवरच सोडून पलायन केले. जागी झालेल्या ग्रामस्थांनी मौजपुरी पोलिसांना याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक विलास मोरे, पोलिस उपनिरीक्षक राकेश नेटके यांनी पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळाला भेट दिली. यामध्ये गायीसह चार चाकी वाहन असा एकूण तीन लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल मौजपुरी ठाण्यात जप्त करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lionel Messi चा तीन दिवसीय भारत दौरा, मुंबईत वानखेडेसह ब्रेबॉनवरही खेळणार, कधी आणि केव्हा? वाचा संपूर्ण वेळापत्रक

Love Jihad : हैदाराबादेत 'लव्ह जिहाद'चं प्रकरण उघडकीस; मूळचा पाकिस्तानी असणाऱ्या भामट्याने हिंदू मुलीला फसवलं अन्...

Maharashtra Rain Alert: पुढील दिवस महत्त्वाचे! मुंबईला मुसळधारेचा इशारा, महाराष्ट्रात कसे असेल हवामान?

Trump-Putin alaska meeting: ट्रम्प-पुतिन भेट अमेरिका सोडून अलास्कामध्येच का? गुप्त भेटीच्या केंद्रस्थानी भारत

Nicholas Saldanha Died: महाराष्ट्राचे दिग्गज क्रिकेटपटू काळाच्या पडद्याआड, पुण्यात घेतला अखेरचा श्वास

SCROLL FOR NEXT