crime news Sakal
मराठवाडा

बीड : मुलगी नको मुलगाच हवा या हट्टापायी महिलेचा गर्भच कापून काढला

बीडमध्ये धक्कादायक घटना

सकाळ वृत्तसेवा

परळी वैजनाथ (जि. बीड) - मुलगी नको, मुलगाच हवा या हट्टापायी कुटुंबीयांनी एका डॉक्टरला हाताशी धरून बेकायदेशीरपणे गर्भलिंगनिदान केले. गर्भात मुलगीच आहे हे लक्षात आल्यानंतर पती आणि सासूच्या सांगण्यावरून त्या डॉक्टरने गर्भ अक्षरश: कापून बाहेर काढला. या प्रकरणातील पिडीत मातेच्या फिर्यादीवरून सासू, पती, व डॉक्टरसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

येथील संभाजीनगर पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील शिवाजीनगर भागातील रहिवासी पिडिता आहे. मागील वर्षी मुलीला जन्म दिलेली ही विवाहिता पुन्हा गर्भवती राहिली. परंतु दुसऱ्या वेळेस मुलगी नको, मुलगाच हवा या हट्टापायी कुटुंबीयांतील सासू छाया वाघमोडे, पती नारायण वाघमोडे यांनी डॉ. स्वामी या डॉक्टरला हाताशी धरून बेकायदेशीरपणे गर्भलिंग निदान केले. गर्भात मुलगीच आहे हे लक्षात आल्यानंतर पती आणि सासूच्या सांगण्यावरून डॉ.स्वामींनी गर्भ अक्षरशः कापून बाहेर काढला. मुलगी असो वा मुलगा, मला गर्भपात नको, माझ्या बाळाला मारू नका असा आक्रोश करणाऱ्या मातेकडेही त्या डॉक्टरने दुर्लक्ष केले. अखेर त्या मातेच्या फिर्यादीवरून पती, सासू, डॉक्टर आणि अन्य एका व्यक्तीवर येथील संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

फिर्यादीनुसार, २०२० साली पिडीतेचे लग्न नारायण अंकुश वाघमोडे याच्यासोबत झाले. लग्न झाल्यापासूनच पती नारायण आणि सासू छाया तिचा मारहाण, शिवीगाळ करून छळ करत. तिला माहेरी देखील बोलू देत नसत. दरम्यान, मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात पिडीतेने एका मुलीला जन्म दिला. त्यानंतर यावर्षी ती पुन्हा गर्भवती राहिली. मुलगाच हवा असा हट्ट पती आणि सासूने धरला. सोनोग्राफी करून गर्भलिंगनिदान करू आणि मुलगी असली तर गर्भपात करायचा असे ते म्हणू लागले. मात्र, मुलगा असो की मुलगी मला गर्भपात करायचा नाही असे तिने स्पष्ट सांगितले. तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून पती आणि सासूने जून महिन्यात गर्भलिंग निदानासाठी डॉ. स्वामी सोबत संपर्क साधला. डॉ. स्वामीने सोनोग्राफी मशीन घेऊन घरी येत गर्भलिंग निदान केले आणि मुलगी असल्याचे सांगितले. १६ जुलैला पहाटे १.३० वाजता डॉ. स्वामी पुन्हा तिच्या घरी आला त्याने तपासणी केली. पिशवीला छिद्र करून गर्भ काढावा लागेल असे त्याने सांगितले. यावेळी देखील गर्भपात करू नका अशी विनवणी पिडीतेने वारंवार केली. सासूने तिचे हात पकडले आणि डॉ. स्वामीने अक्षरशः गर्भ कापून तुकडे करून बाहेर काढला.

चौघांवर गुन्हा

शनिवारी (ता.१६) सकाळी पिडीतेचा भाऊ आला. पती, सासू यांना विनंती करून रात्री तो तिला घेऊन पुण्याला गेला. अखेर तिने पोलीस ठाणे गाठून झालेल्या प्रकाराविरोधात फिर्याद दिली. तिच्या फिर्यादीवरून पती नारायण वाघमोडे, सासू छाया वाघमोडे, डॉ. स्वामी आणि प्रकाश कावळे या चौघांवर येथील संभाजीनगर पोलीस ठाण्यात सोमवारी (ता.२५) सायंकाळी कलम ३१३, ३१५, ३१८, ३४, ४९८-अ, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोल्हापूर हादरलं! 'मोक्या'तील गुन्हेगारावर अज्ञातांचा गोळीबार; रिंग रोडवर तणाव, नेमकं काय घडलं?

Double Decker Bus: पुण्यात दिसणार डबल डेकर इलेक्ट्रिक बस! मंगळवारपासून शहरातील 'या' रस्त्यांवर धावणार

Latest Marathi News Live Update : वेस्टर्न एक्सप्रेस-वेवर अपघात, पाच कार अन् एक बसची एकमेकांना धडक, प्रवाशी किरकोळ जखमी

अमेरिकेत महागाईचा भडका! भारतीयांवर मोठी जबाबदारी; रघुराम राजन यांच्यासह या ३ व्यक्ती फेडच्या टास्क फोर्समध्ये

IND vs ENG: दुसऱ्या वनडेपूर्वी भारताला मोठा धक्का! गुरनूर ब्रारवर ICC ची कारवाई; वाचा नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT