dharashiv  sakal
मराठवाडा

Dharashiv News : धावत्या तीन ट्रकमधून दोन लाखांचा माल पळवला

धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर धाराशिव जिल्हा हद्दीत (मलकापूर ते येडशी दरम्यान) हा प्रकार घडला आहे.

सकाळ वृत्तसेवा

धाराशिव : कर्नाटकातील तीन ट्रकमधून लुटारुंनी दोन लाख रुपयांचा माल लंपास केला आहे. चालत्या ट्रकमधून चोरट्यांनी माल पळविला आहे. धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर धाराशिव जिल्हा हद्दीत (मलकापूर ते येडशी दरम्यान) हा प्रकार घडला आहे. राष्ट्रीय महामार्गावर वाहनांना लुटण्याचे प्रकार थांबण्याचे नाव घेत नाहीत. उमरगा हद्दीत एका निवेदिकेची गाडी अडवून

लुटण्याचा प्रयत्न घेडलेला असताना पुन्हा एकदा असाच प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे एकाच दिवशी तिन ट्रक एकाच ठिकाणी लुटण्यात आले आहेत. चालत्या ट्रकमधून चोरट्यांनी माल लंपास केले आहेत. या तिन्ही ट्रक कर्नाटकातील आहेत. छत्रपती संभाजीनगरहून सोलापूरच्या दिशेने ट्रक जात होत्या. केए २५ - एए ६३८९ या ट्रकमधून ५४ हजार ५०९ रुपयांचे लेडीज

ड्रेस मटेरियल चोरट्यांनी पळविले आहे. ट्रकवर चढून त्यावरील ताडपत्री फाडून माल लंपास केला आहे. त्याच ठिकाणी ट्रक क्रमांक केए २५, एए ४२२० मधून १० हजार २३८ रुपयांचे लेडीज ड्रेस मअेरियल चोरीला गेले आहे.

तर गाडी क्रमांक केए २५, एए ६८८१ या ट्रकमधून पुरुषांचे शर्ट, शिगारेट, सोनपापडी, लेडीज शर्ट, छत्रीच्या काड्या असा सुमारे २ लाख ९ हजार ३१५ रुपयांचा माल चोरट्यांनी चालत्या गाडीतून पळवला आहे.दिनेश शिवराज गवशेट्टी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून येरमाळा (ता. कळंब) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics : शरद पवारांचं वय झालंय, ते आता थकलेत, 'राष्ट्रवादी'ने कोणत्यातरी पक्षासोबत जावे; मंत्री चंद्रकांतदादांचा थेट सल्ला

Who was Sandu Karhale? : मराठवाडा मुक्ती संग्रामातील धगधगता तारा हरपला! ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक सांडू कऱ्हाळे यांचे वयाच्या 100 व्या वर्षी निधन, निल्लोडवर शोककळा

Latest Marathi News Update : खालापूर जवळील इमॅजिका पार्कमध्ये 47 वर्षीय पर्यटकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Gold Silver Price : सोने-चांदी झाले स्वस्त; एका दिवसात सोने ५ हजारने तर चांदी ४ हजार ९०० रुपयांनी घसरली

Fatty Liver: भारतात झपाट्याने वाढतोय फॅटी लिव्हरचा धोका! अशी ओळखा लक्षणे...

SCROLL FOR NEXT