The theft took place at Kurunda market on Monday 
मराठवाडा

कुरुंदा बाजरपेठेत भर दिवसा चोरी, व्यापाऱ्याचे दोन लाख रुपयेे लंपास

मारोती काळे

कुरुंदा (हिंगोली) : वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे सोमवारी (ता.११) भर दिवसा चार वाजता व्यापाऱ्याला लुटून बॅगमधील दोन लाख रुपये लुटून पसार झाले आहे. सदरील घटना गावातील मुख्य बाजारपेठेत घडल्यांने व्यापाऱ्यामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वसमत तालुक्यात कुरुंदा येथे सोमवारी मुख्य बाजारपेठेत असलेले राजकुमार किराणा स्टोअर्सचे मालक प्रल्हादराव गुळगुळे हे तीन लाख पंचाहत्तर हजार रुपये बँकेत भरण्यासाठी जात असताना मोटार सायकलवर आलेल्या ईसमांनी त्यांना हटकले व आम्ही लाचलुचपत विभागाचे आहोत आपल्या बॅगमध्ये चरस आहे. ती बॅग आम्हाला उघडण्यासाठी द्या असे म्हणाले. श्री गुळगुळे यांनी नकार देताच त्यांच्या हातातील बॅगमधील दोन लाख रुपये घेऊन विना नंबरच्या गाडीवरुन पळ काढला. सदरील घटना ही मुख्य बाजारपेठेत घडल्यांने व्यापाऱ्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या चोरट्यांनी गावातील अन्य एका सराफ दुकानात चोरीच्या हेतुने चौकशी केली असल्याचे व्यापाऱ्यानी सांगितले. सदरील घटनास्थळी पोलिस उपअधिक्षक  श्री. हाश्मी, गुन्हे आन्वेशन विभागाचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय, कुरुंदा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. गोपिनवार यांनी पाहणी करुन माहिती घेतली. सीसीटीव्हीच्या फुटेजद्वारे या चोरट्यांचा तपास लावला जात आहे. सदरील घटनेसंबधी उशीरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJPचा दिल्लीत एल्गार! अभिजीत दीपकेंच्या पक्षाकडून ५ सप्टेंबरला मोर्चाची घोषणा; काय आहेत मागण्या?

NEET PG Admit Card 2026: ३० ऑगस्टला होणार नीट पीजी परीक्षा; डायरेक्ट लिंकवरून 'असे' डाऊनलोड करा हॉल तिकीट...

भारत-पाकिस्तान सीमेवर ‘तारिणी’चं शूटिंग! बॉर्डरवर शूटिंग करणारी ‘तारिणी’ ठरली पहिली मराठी मालिका!

Marathi News Live Updates : २९ ऑगस्टला आंदोलन करणारच, निर्णायक आंदोलन होणार - जरांगे

Palghar Ashramshala: गडचिराेलीनंतर पालघरच्या आश्रमशाळेत धक्कादायक घटना; ७ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, १९ जणांना ताप

SCROLL FOR NEXT