There has been a bomba maro agitation against the power company.jpg 
मराठवाडा

लाईट बिलाची होळी करत विज कंपनीच्या विरोधात 'बोंबा मारो' आंदोलन

राम काळगे

निलंगा (लातूर) : राज्याचे सरकार हे महावसूली सरकार असून नागरिकांना विजकंपनीकडून अव्वाच्या सव्वा बील आकारणी केली जात आहे. नागरिक कोरोनासारख्या भयंकर संकटात असताना वीज बिलांची सक्तीने वसुली केली जात आहे. या विरोधात भारतीय जनता पार्टीच्या वतीने रविवारी (ता. 28) रोजी रात्री होळी सणाच्या दिवशी माजीमंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी वीज बिलांची होळी करीत 'बोंबा मारो आंदोलन' केले. शिवाय तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यांनीही गावागावात बीलाची होळी केली. 

चार दिवसापूर्वी आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून नागरिक व कार्यकर्त्यांना संवाद साधत होळी सणाच्या दिवशी विजबीलाची होळी करणार असल्याचे जाहीर केले होते. कोविड-19 काळात अनेक महिने दुकाने व व्यवसाय बंद होते. त्यामुळे अनेकांची रोजीरोटी बंद पडली. मात्र या काळातील विजबीलात सवलत देवू म्हणून राज्य सरकारने शेतकरी, व्यापारी, घरगुती ग्राहक यांची निराशा केली. महावितरणने भरमसाठ बिले दिल्यामुळे अनेकांचे कंबरडे मोडले असून बिल भरणे शक्य नाही.साध्या केस कर्तनालयासारख्या दुकानदारांना लाखोंची बिले आली आहेत. काही ठिकाणी वीज जोडणी देण्यापूर्वीच वीज बिले पाठविली आहेत.
 
यामुळे सामान्य नागरिक संकटात असल्याने या सरकारच्या विरोधात 28 तारखेला होळी पौर्णिमेदिवशी सरकारच्या विजबीलाची होळी केली जाणार असल्याचे सांगितले होते. निलंगा येथे त्यांच्या निवासस्थानी होळी साजरी करीत या सरकारला चांगली बुध्दी देवो म्हणून अव्वाच्या सव्वा विजबील आलेल्या बीलाची होळी केली. शिवाय राज्य सरकारचा निषेध करीत 'बोंबाबोंब' आंदोलन केले. शिवाय महावसूली सरकार म्हणत सरकारच्या विविध कार्यपद्धतीचा निषेध त्यांनी यावेळी नोंदवला. 

यावेळी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, माजी नगराध्यक्ष विरभद्र स्वामी, उपनगराध्यक्ष मनोज कोळ्ळे यासह अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. सध्या मार्च अखेर असल्याने विजकंपनीकडून पाणीपुरवठा, स्ट्रीट लाइट, शेतीपंप, विंधन बोअरचे कनेक्शन कापले जात असून यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. 15 दिवसात विजबील दुरूस्ती करून द्या, अन्यथा यापेक्षा तिव्र आंदोलन केले जाईल, असा ईशारा त्यांनी यावेळी दिला.
 
संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या अवाहनाला प्रतिसाद देत मतदार संघातील कार्यकर्त्यांनीही विजबीलाची होळी करीत त्यांचे फोटो सोशल मीडियावर पाठवून राज्य सरकारच्या नावाने बोंबल्या आंदोलन केले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP-Shiv Sena alliance in Mumbai : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप अन् शिवसेनेचा जागा वाटपाचा फॉर्म्यूला जाहीर!

Guhagar-Vijaypur highway accident : गुहागर-विजयपूर महामार्गावर तामखडी नजीक भीषण अपघात; एक जण ठार तर सहाजण जखमी

Akola Municipal Election : अकोल्यात महायुतीतील जागा वाटपाचा तिढा अखेर सुटला; प्रचाराला वेग!

Bhandup Bus Accident :भांडुप स्टेशनजवळ 'बेस्ट बस'चा मोठा अपघात; चार ते पाच चिरडलं, दोन महिलांचा मृत्यू

Nashik Election: नाशिकमध्ये महायुतीचं फिस्कटलं! भाजपकडून प्रतिसाद नाही, दोन पक्षांनी घेतला 'हा' निर्णय

SCROLL FOR NEXT