3Pune_Expensive_drugs_are_ta_0 
मराठवाडा

उस्मानाबाद स्त्री रुग्णालयामधील औषधांचा साठा संपला, अधिकाऱ्यांना सांगता येईना वस्तुस्थिती

तानाजी जाधवर

उस्मानाबाद - जिल्हा स्त्री रुग्णालयामधील औषधांचा साठा संपत आला आहे. ही बाब स्वतः वैद्यकीय अधीक्षक डॉ.सचिन देशमुख यांनी मान्य केली आहे. दुसऱ्या बाजुला जिल्हा रुग्णालयात औषधांचा पुरवठा नसतानाही तेथील अधिकारी वस्तुस्थिती सांगायला तयार होत नाहीत. प्रशासनाची ही लपवा-छपवी त्यांच्याच जिल्हा प्रशासनाच्या अंगलट येण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यामध्ये औषधाचा पुरवठा मुबलक प्रमाणात नसतानाही आरोग्य प्रशासन वस्तुस्थिती स्विकारायला तयार नाहीत. साठा असल्याची माहिती रविवारी दिल्यानंतर सोमवारी जिल्हा स्त्री रुग्णालयातील औषधाच्या साठ्याविषयी तेथील वैद्यकीय अधीक्षक डॉ.देशमुख यांच्याशी संवाद साधला. तेव्हा खरी परिस्थितीसमोर आली असुन साठा संपलेला असुन ९० पैकी २६ औषधांचा साठा संपला असल्याची माहिती डॉ.देशमुख यानी दिली.

यामध्ये महत्‍वाची व अत्यावश्यक औषधे असुन सामान्य रुग्णांना यासाठी पुन्हा खासगी ठिकाणी औषधासाठी जावे लागण्याची शक्यता आहे. एकट्या स्त्री रुग्णालयाची गेल्या वर्षीची उसनवारी जवळपास साडेचौदा लाख रुपयांची झाली आहे. त्याचेही पैसे अद्याप दिले नसल्याने खाजगी ठिकाणाहुनही रुग्णालयाला औषधाचा पुरवठा करणे बंद केल्याची धक्कादायक बाबसमोर आली आहे.

शिवाय कोरोनाच्या काळात दोन ते अडीच लाखांची उसनवारी केल्याची बाब देखील पुढे आली आहे. असे असतानाही जिल्हा रुग्णालय प्रशासन खरी माहिती माध्यमाना का सांगत नाही ? असा सवाल आता विचारला जाऊ लागला आहे. खरी माहिती सांगितल्याशिवाय औषधाचा साठा उपलब्ध होणार नाही. माध्यमापासुन माहिती लपवून सगळ आलबेल आहे, असे दाखवुन जिल्हा आरोग्य प्रशासन नेमक काय साध्य करणार नाही याचाही उलगडा होत नाही.

महिला रुग्णालयात तर अत्यंत सामान्य व गरजु कुटुंब दाखल होतात. त्या ठिकाणी रुग्णांची संख्या सर्वाधिक असते. त्यामुळे अशा गरीब कुटुंबातील व्यक्तींना फक्त प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे बाहेरुन जाऊन औषधे घेण्याची वेळ येणार आहे. मागणी करुनही औषधाचा साठा होत नसल्याने स्त्री रुग्णालय प्रशासनाला रुग्णाच्या रोषाला सामोरे जावे लागते. अशा गंभीर बाबीकडे डोळेझाक करणाऱ्या आरोग्य प्रशासनाला जिल्हा प्रशासनाकडुन उचित समज देण्याची आवश्यकता आहे.


(संपादन - गणेश पिटेकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026 : क्रिकेटची आवड असलेल्या Jay Meena ने इतिहास रचला! भारताला सॉफ्ट टेनिसमध्ये जिंकून दिले पहिले आशियाई पदक... जाणून घ्या कोण आहे तो?

Gold Rate Today: दसऱ्याआधी सोनं स्वस्त! सराफा बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण; तुमच्या शहरात ताजा भाव पाहा

Raj Thackeray IIT Bombay : आयआयटी मुंबईतील साहिल वाकोडे प्रकरणावर राज ठाकरे स्पष्टच बोलले; शिक्षणव्यवस्थेवरही सवाल

Marathi News Live Updates : 'आयुष्मान भारत' योजनेतंर्गत ६० कोटी भारतीयांना ५ लाखांचे आरोग्य कवच उपलब्ध- पंतप्रधान नरेंद्र मोदी

Solapur Cyber Fraud,पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअरला ४५ लाखांचा गंडा, जादा नफ्याचे आमिष महागात; वर्षाला २८ लाखांचे आहे पॅकेज

SCROLL FOR NEXT