bank andolan 
मराठवाडा

येथे झाली कर्जमाफीची माहिती देणाऱ्या कर्मचाऱ्याला मारहाण

मंगेश शेवाळकर

हिंगोली: तालुक्यातील सवड येथे पीककर्ज माफीची माहिती देणाऱ्या भारतीय स्टेट बँकेच्या कर्मचाऱ्याला सात ते आठ जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना मंगळवारी (ता.२६) घडली. या घटनेमुळे भारतीय स्टेट बॅंकेच्या हिंगोली शहरातील सर्व शाखांचे कामकाज ठप्प पडले आहे. मारहाण करणाऱ्यांना अटक करावी, अशी मागणी बॅंकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लावून धरली आहे.

येथील भारतीय स्टेट बँकेचे कर्मचारी प्रविण कटरे, सुमत उंबरकर व कार्तिक पवार हे तालुक्यातील सवड येथे सकाळी साडेदहा वाजता कर्जमाफीची माहिती देण्यासाठी गेले होते. या वेळी श्री. कटरे हे कर्जमाफीची माहित देत असताना गावातील सात ते आठ जणांनी श्री. कटरे यांना मारहाण करण्यास सुरवात केली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे इतर कर्मचारी व गावकरीही गोंधळून गेले. त्यानंतर बँकेच्या इतर कर्मचारी व गावकऱ्यांची श्री. कटरे यांची सुटका केली. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी गावातून काढता पाय घेतला. 

कर्मचाऱ्यांचा पुन्हा पाठलाग
परंतु, पून्हा त्या सात ते आठ जणांच्या टोळक्याने त्यांना मारहाण करण्यासाठी पाठलाग सुरु केला. त्यामुळे बॅंकेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचे वाहन थेट हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात आणले. त्यानंतर या घटनेची माहिती बँकेच्या इतर कर्मचाऱ्यांना दिली. या घटनेमुळे शहरातील पाच बँकेचे कर्मचारी पोलिस ठाण्यात एकत्र आले. या प्रकरणी श्री. कटरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. जो पर्यंत मारहाण करणाऱ्यांना अटक होत नाही, तो पर्यंत बँकेचे कामकाज सुरु केले जाणार नाही, अशी भूमिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतली. त्यामुळे बँकेचे कामकाज ठप्प झाले होते.

या शाखांचा समावेश
हिंगोली तालुक्यातील सवड येथे पीक कर्जमाफीची माहिती देण्यासाठी गेल्यानंतर कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्याची माहिती शहरातील भारतीय स्टेट बॅंकेची मुख्य शाखा, कृषी विकास शाखा, बासंबा शाखा, एनटीसी शाखा व ग्रामीण प्रशिक्षण केंद्राच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना समजल्यानंतर या कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले. मारहाण करणाऱ्यांना अटक होत नाही,तो पर्यंत कामकाज सुरू करणार नसल्याची भूमिका घेतली. त्यामुळे या बँकेच्या शाखेचे कामकाज या आंदोलनामुळे ठप्प झाले. बॅंकेच्या कामानिमित्त आलेल्या ग्राहकांना मात्र, या आंदोलनाचा फटका बसला असून रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Inspring Story Engineer Marries Farmer: इंजिनियर वैष्णवीने निवडला शेतकरी जोडीदार; 'मानसिकता बदलण्याची गरज' असल्याचे आवाहन

'मी अनेक मुलींसोबत रिलेशनमध्ये होते' गौरव खन्नाची पत्नी आकांक्षाचा खुलासा, म्हणाली... 'मुलींसोबत इतकी इंटिमेट...'

Marathi Live Updates : मुंबईत गेल्या २४ तासांत विक्रमी मुसळधार पाऊस, पुढील दोन दिवसही जोर कायम

Beed: 'तुकाराम मुंढे पॅटर्न'ची बीडमध्ये एन्ट्री?; एफडीएच्या धडक कारवाईने व्यापाऱ्यांची पळापळ, परवान्यासाठी महिनाभरात 2,241 अर्ज

Mumbai-Goa Highway: मुंबई गोवा महामार्ग ठप्प, ३ फूटापर्यंत पाणी; नागोठणेपासून पर्यायी मार्गाने वाहतूक

SCROLL FOR NEXT