file photo
file photo 
मराठवाडा

मच्छी बाजाराला येणार अच्छे दिन येणार....

शिवचरण वावळे

नांदेड : शहरात मासळी खाणाऱ्या खव्वयांची संख्या कमी नाही. परंतु बाजारातुन आवडीने घरी आणलेले बर्फातील मासे अर्धवट शिजताहेत, यामुळे जेवण्याच्या ताटावर बसलेल्या खव्वयांचा चांगलाच हिरमोड होत असे. परिणामी खव्वयांना मासे खाण्यास मुरड घालावी लागत होती. परंतु लवकरच शहरात पाच कोटीचे मच्छी मार्केट उभारले जाणार असून, खव्वयांना ताजी मासळी खाण्यासाठी मिळणार आहे.

हल्ली शहरात मासळी बाजारात मोठ्या प्रमाणावर मासे विक्रीसाठी येत आसले तरी, आज न विकलेले मासे ठेवण्यासाठी इथल्या मासे विक्रेत्यांकडे पुरेशी व्यवस्था नाही. त्यामुळे अनेकजण मोजक्या प्रमाणात मासे विक्रिस घेऊन येतात. त्यातही शिल्लक मासे ठेवण्यासाठी व्यवस्था नसल्याने मासे लवकर खराब होतात. परंतु मासे खाण्या लायक नसले तरी, अनेक विक्रेते मात्र कमी बर्फात मासे ठेवत आहे. 

इथे भरतो मच्छी बाजार 
 
सध्या शहरातील इतवारा बाजार, एलआयसी परिसर आणि भाग्यनगर पोलीस चौकी समोरील पडीत जागेत मासळी बाजार भरतो. या ठिकाणी मोजकेच लोक मासे विक्रिसाठी घेवून येतात. त्यामुळे शहरात मासे विक्रेत्यांसाठी ठराविक आणि निश्चित जागाच उपलब्ध नाही. 

जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार 

महापालीकेने शहरातील फळभाजी मार्केट, फुल बाजार, मासे विक्रेत्यांना मार्केटसाठी जागा निश्चित करुन त्यांच्यासाठी स्वतंत्र मार्केट उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. यातील काहींना हक्काचे मार्केट मिळालेले आहे. परंतु मासे विक्रेत्यांसाठी शहरात हक्काचे मार्केट नाही. हीच गोष्ट जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या महालिकेच्या प्रभारी आयुक्त पदाची जवाबदारी असताना निदर्शनास आली. त्यांनी मासळी बाजारासाठी केंद्रसरकारकडून पाच कोटीचा निधी मिळवण्यासाठी पाठपुरावा केला. सध्या मार्केटसाठी जागेचा शोध सुरु आहे. त्यामुळे खव्वयांना लवकरच ताजी मासळी खाण्याचा आनंद घेता येणार आहे.

एका महिण्यात मच्छी मार्केटच्या जागा निश्चित

मच्छीमारांसाठी शहरात स्वतंत्र मच्छी मार्केट व्हावे यासाठी गेल्या वर्षापासून प्रयत्न सुरु आहेत. यासाठी केंद्र सरकारकडून पाच कोटीचे अनुदान देण्यात येते. परंतु महापालीका आणि मत्स्य विभागाचे अधिकारी याकडे वर्षभरापासून दुर्लक्ष होत होते. परंतु दोन्ही अधिकारी यांना बोलावून एक महिण्यात जागा निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत. लवकरच मच्छी मार्केटचा प्रश्न मार्गी लागेल.
अरुण डोंगरे, जिल्हाधिकारी

वखार महामंडळ कार्यालयाची साडेसात एकर जागा पडीत

शहरातील एलआयसी विभागाच्या बाजुस असलेल्या वखार महामंडळ कार्यालयाची साडेसात एकर जागा पडीत आहे. तसेच याच ठिकाणी प्राधिकरण विभागाची देखिल साडेतीन एकर जागा पडीत आहे. शिवाय भाग्यनगर पोलीस ठाणेला लागुन ७० पेक्षा अधिक गाळे आहेत. याची मागणी केली जात आहे. परंतु शासन आम्हाला इतवारा येथे जागा देऊ इच्छिते त्या ठिकाणी आमचा निभाव लागणार नाही. त्यामुळे मच्छिमार संघटनेकडून वखार महामंडळ किंवा भाग्यनगर पोलीस ठाण्या शेजारचे गाळे मागणी केली आहे.
नानासाहेब लकारे (जिल्हाध्यक्ष, भोई समाज संघटना भारत)
 
 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UAPA: ओसामा बिन लादेनचे फोटो, ISIS चे झेंडे बाळगणे गुन्हा नाही: हायकोर्ट

MS Dhoni : अखेर सत्य आले समोर! रणनीती नाही तर... या कारणामुळे ९व्या क्रमांकावर बॅटिंगसाठी आला 'थाला'

Viral: पवार गटाचं काम करणाऱ्याला दत्ता भरणे यांच्याकडून शिवीगाळ? व्हिडिओ रोहित पवारांकडून शेअर

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : लातुरातील सुनेगाव-सांगवीतील गावकऱ्यांचा मतदानाला बहिष्कार

Met Gala 2024 : परी म्हणू की सुंदरा! रेड कार्पेटवर ईशाचाच जलवा, स्पेशल फ्लोरल ड्रेस बनवण्यासाठी लागले तब्बल 10 हजार तास

SCROLL FOR NEXT