नांदेड : जुन्या आणि नव्या गाण्यांची सांगड घालून वेगवेगळ्या गीत रचना, नृत्य आणि मिमिक्री सादर करीत स्वरांनदवनच्या कलावंतांनी आपल्या कलेच्या माध्यमातून नांदेडकर रसिकांची मने जिंकली. शहरातील शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात गुरुवारी (ता. २६) सायंकाळी महारोगी सेवा समितीद्वारा संचलित व डॉ. विकास आमटे निर्मित आनंदवनच्या स्वरांनदवन कार्यक्रम उत्साहात पार पडला़. ज्येष्ठ समाजसेवक डॉ़. विकास आमटे, सामाजिक कार्यकर्त्या राजश्री हेमंत पाटील, प्रा. नागेश कल्याणकर यांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली़.
प्रारंभी स्वरानंदवन कलावंतांनी सुर निरागस हो़, गणपती स्तवन सादर केले. आनंदवन तुमच्या द्वारी या संकल्पनेतून साकारलेल्या या कार्यक्रमात कुष्ठरोगी व दिव्यांग कलाकारांनी गायन, वादन, नृत्य आदी कलाविष्कार सादर केले़. या संगीत रजनी कार्यक्रमात कलावंतांनी सादर केलेल्या प्रतिकृतीने रसिकांच्या काळजाचा ठेका चुकविला़.
हेही वाचा ----चहाच्या युगात ‘कपाला’ अच्छे दिन...
स्वरानंदवनच्या कलावंतांना टाळ्या
शृंखला पायी असू दे,
मी गतीचे गीत गाई़़़
दु:ख उधळायास आता,
आसवांना वेळ नाही़़़
हे गीत सादर करून स्वरानंदवनच्या कलावंतांनी टाळ्या मिळविल्या.
त्यानंतर आनंद साधकांनो यारे, मिळून सारे मुक्तांगणात या रे या़, हे पु. ल़. देशपांडे यांनी प्रेरित केलेले गीत सादर केल्यानंतर रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली़. जसजसे गीत आणि नृत्य सादर होत होते तसतसा कार्यक्रम बहरत गेला.
गीतावरील नृत्य काळजाचा ठोका चुकवणारे
दरम्यान, उपशास्त्रीय गीत केसरिया बालमा, सहज हसुनी पाहतेस हे नृत्य सादर केले़ आधा है चंद्रमा, रात आधी़़़ ओ लडकी है कहाँ़़ हे नृत्य सादर करून श्रोत्यांची दाद मिळविली़ . आधा हैं चंद्रमा या गीतावरील नृत्य काळजाचा ठोका चुकवणारे ठरले. कभी शाम ढले तो, मेरे दिल में आ जा ना, मिले हो तुम हमको यासह कपल नृत्य मराठमोळी लावणी दिव्यांग कलाकारांनी सादर केली़.
येथे क्लीक करा---‘या’ कलेवरची रसिक श्रोत्यांची निष्ठा आजही कायम
आदाकारीने प्रत्येक प्रेक्षकांना जिंकले.
दिव्यांग कलाकारामध्ये वैशाली करारे, मनीषा बारसागडे, करुणा मानकर, दिव्या निशाद, सुनील नकाते, प्रतिमा देशमुख, सोनू मालघुरे, अमोल गोरडे, उज्ज्वला गायगवळी, हेमा भोयर, सविता गोरडे, मंगल भिवंडीकर, नरेश चांदेकर, तसेच सुधीर, अमोल, संतोष, शमा, विवेक, प्राजक्ता, दिव्या, गजानन, काजल, धनश्री, देवेंद्र या कलाकारांनी वेगवेगळी गीते सादर करून रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले़. आयोजक शिवाजी गावंडे आणि त्यांच्या टीमने केलेले नियोजन वाखाणण्याजोगे होते.
भारत जोडो गीत हम युवकों का नारा है़़़
स्वरानंदवन प्रकल्पाचे मुख्य व्यवस्थापक सदाशिव ताजणे, रंगमंच व्यवस्था प्रमुख रवींद्र नलगींटवार, ध्वनी व्यवस्था नंदादीप देवगडे, धर्मपाल बारसे, प्रकाश व्यवस्था रमेश मेकलवार, मेघराज भोयर यांनी विशेष मेहनत घेतली़ एकापेक्षा एक सरस गीत, नृत्य व मिमिक्री सादर करून रसिकांना सलग तीन तास खिळवत ठेवले़. सूत्रसंचालन स्वातीताई वाठ यांनी केले़ प्रास्ताविकात राजश्री पाटील यांनी आनंदवन आणि स्वरानंदवन विषयी माहिती दिली़ यशस्वीतेसाठी शिवाजी गावंडे व मित्र परिवारांने परिश्रम घेतले़
थंडीतही रसिकांनी या स्वरसाधनेचा आनंद घेतला़ या कार्यक्रमाचा समारोप भारत जोडो गीत हम युवकों का नारा है़़़ भारत हमको प्यारा है़़़ या गीताने झाला़.
हे एकदा पहाच---Video : सव्वा कोटीची ऊस तोडणी मशीन जळून खाक
दीड लाख रुपयांचे मानधन सुपूर्द
कॅन्सर वर मात करून अनेकांना हिम्मत देणारा युवक मारोती देमगुंडे रा.माथा ता औंढा व जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र यांचे अप्रतिम कार्य करणाऱ्या विष्णू वैरागड या दोघांच्या हस्ते स्वरानंदवनचे संयोजक सदाशिव ताजने यांच्याकडे दीड लाख रुपयांचे मानधन सुपूर्द करण्यात आले. यावेळी खासदार हेमंत पाटील, राजश्रीताई पाटील, सुधाकर आडकीने, प्रा.नागेश कल्याणकर, अजय झरकर, स्वाती दळवी, प्रा. नामदेव दळवी, बालाजी बोडखे यांची उपस्थिती होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.