Osmanabad Crime News
Osmanabad Crime News esakal
मराठवाडा

Osmanabad | उमरग्यात चोरट्यांनी एटीएम फोडले,७७ हजारांची रक्कम पळविली

अविनाश काळे

उमरगा (जि.उस्मानाबाद) : उमरगा (Umarga) -लातूर महामार्गावरील नारंगवाडी पाटीवर एटीएम मशिन फोडून चोरट्यांनी जवळपास ७७ हजार रूपयांची रक्कम पळविली. शुक्रवारी (ता.२५) सकाळी साडेनऊच्या सुमारास चोरीचा प्रकार दिसून आला. याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार नारंगवाडी पाटीवर शुभांगी नेताजी सांगवे यांनी हिचके कंपनीशी करार करून एटीएम सुरु केले होते. शुक्रवारी पहाटे चोरट्यांनी एटीएम (ATM) केंद्राचे शटर तोडुन आणि पाठीमागुन पत्रा उचकाटुन आत प्रवेश केला. गॅस कटरने मशिनची तोडफोड केली. मुख्य बॉक्समधील ६७ हजार रुपये व रिजेक्शन बॉक्समधील नऊ हजार रुपये असे ७७ हजार रुपये चोरट्यांनी पळविले. (Thieves Broken ATM Machine And Stolen 77 Thousand In Umarga Of Osmanabad)

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्रभारी पोलिस निरीक्षक समाधान कवडे, बीट अंमलदार गिरी आदींनी घटनास्थळाची पाहणी केली. दरम्यान सायंकाळी श्वानपथकाने माग काढण्याचा प्रयत्न केला. ठसे तज्ज्ञांच्या पथकानी अधिक माहिती घेतली. तुळजापूरच्या (Tuljapur) उपविभागीय अधिकारी भोरे - पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. दरम्यान एटीएम केंद्रात अथवा बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने चोरट्यांना चांगलीच संधी मिळाली. सीसीटीव्ही कॅमेरे यंत्रणा संबंधित कंपनीकडुन बसविण्याचे काम होणार होते. (Osmanabad)

मात्र त्या अगोदरच चोरट्यांनी एटीएमच्या गल्ल्यावर डल्ला मारला. या प्रकरणी शुभांगी सांगवे यांच्या तक्रारीनुसार रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Shreyas Talpade: कोरोना लसीमुळे हृदयविकाराचा झटका आला? श्रेयस तळपदे म्हणाला,'लस घेतल्यानंतर मला...'

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : चाहरनं सीएसकेला पाडलं खिंडार, ऋतुराज पाठोपाठ दुबेलाही केलं बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

SCROLL FOR NEXT