मराठवाडा

Crime News : येडेश्वरी देवीच्या यात्रेत चोरट्यांनी लाखोंचे दागिने पळवले

दीपक बारकूल

येरमाळाः श्री येडेश्वरी देवीच्या चैत्र पौर्णिमा यात्रेत तगडा पोलिस बंदोबस्त असुनही गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी चुना वेचण्याचा कार्यक्रमात लाखो रुपयांचे दागिने लुटले. तसेच दुचाकीही पाळवल्या. यात्रा स्पेशल मुक्कामी बसमधील हजारो रुपयांचे डिझेलही लांबवल्याची घटना घडली आहे.

श्री येडेश्वरी देवीच्या चैत्र पौर्णिमा यात्रेच्या चुना वेचण्याच्या कार्यक्रमासाठी तगडा पोलिस बंदोबस्त असूनही गर्दीचा फायदा घेत महिला भाविकांच्या गळ्यातील दागिन्यासह काही भाविकांच्या खिशाला कात्री तर यात्रा स्पेशल मुक्कामी बस मधील डिझेलसह भाविकांच्या दुचाकी लांबवल्याचे पोलिस मुख्यालयाने प्रकाशित केलेल्या भाविकांच्या फिर्यादी अहवालातून समोर आले आहे.

वैष्णव शंकर वीर, वय २७ वर्षे, रा. सुतमिल रोड कापडमिल विठ्ठल मंदीर जवळ लातुर ता. जि. लातुर यांची अंदाजे तीस हजार रु किंमतीची होंन्डा कंपनीची यूनिकॉर्न मोटरसायकल क्र एमएच १२ एल.बी. ५२०४ ही (ता.२४ )रोजी दहा ते सव्वा बाराच्या सुमारास प्रतिक हॉटेलच्या शेजारी येरमाळा येथून अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली.अशी फिर्याद वैष्णव विर यांनी (ता.२६) रोजी दिली आहे.

सुरेश उर्फ नाना वसंतराव फड, वय ३७ वर्षे कन्हेरवाडी ता.परळी जि. बीड, यांची अंदाजे सत्तर हजार किंमतीची वीस ग्रॅम वजनाची सोन्याची चैन ओम असलेली ही (ता.२४) रोजी साडे अकराच्या सुमारास येडेश्वरी यात्रेतील चुन्याच्या शेतात येरमाळा येथे अज्ञात अरोपींने गर्दीचा फायदा घेवून सुरेश फड गळ्यातील चैन चोरुन नेल्याची (ता.२५) रोजी तर अयुब मकबुल नदाफ, वय ५६ वर्षे, व्यवसाय चालक बेंच नं १३२२ रा. प. म. उमरगा आगार जि धाराशिव रा. नळदुर्ग ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी (ता.२५) रोजी बस क्र एमएच २० बीएल २७०१ व बस क्र.एमएच २० बीएल २६३० या दोन बस मधील रात्री दोन ते सहाच्या सुमारास यात्रा शेड चुन्याच्या रानात येरमाळा येथे मुक्कामासाठी थांबले असता अज्ञात व्यक्तीने बसमधील अंदाजे छत्तीस हजार नऊशे रुपयाचे चारशे दहा लिटर डिझेल चोरुन नेले अशी फिर्याद (ता.२५) रोजी दिली.

तर केशरबाई माणिकराव घोलप, वय ६५ वर्षे, रा.भरतपुर धनलक्ष्मी दाळ मिल बार्शी ता. बार्शी जि. सोलापूर यानी ता.२४ रोजी चुन्याच्या रानात येडेश्वरी देवी पालखीचे विसावा कट्टा येथे दर्शनासाठी गेले असता केशरबाई घोलप यांचे गळ्यातील पावणे दोन तोळे सोन्याचे गंठण अंदाजे पासष्ट हजार रुपये किंमतीचे अज्ञात व्यक्तीने गर्दीचा फायदा घेवून चोरुन नेले. अशी फिर्याद ता.२५ रोजी येरमाळा पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.

यात्रेसाठी विविध पोलिस पथकाची बंदोबस्तासाठी नेमणूक केली असूनही लाखो रुपयांचा डल्ला चोरट्यांनी मारल्याने कित्येक लोकांनी फिर्यादीही नोंदवल्या नाहीत. तर सध्या सिसिटीव्ही कॅमेरे असूनही असे प्रकार आमराई पालखी मंदिरात घडत असल्याचे भाविकांनी बोलताना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदी सरकारचा मोठा निर्णय! Asia Cup 2025 स्पर्धेतील India vs Pakistan लढत होणार की नाही? फैसला झाला

Maruti Cars: जीएसटी कमी झाल्यानंतर अल्टो, स्विफ्ट, डिझायर आणि वॅगनआरची किंमत किती असेल?

Prithvi Shaw : IPL 2026 मध्ये पृथ्वी शॉ CSK च्या ताफ्यात? ऋतुराज गायकवाडची मध्यस्थी? फ्रँचायझीने पोस्ट केला Video

न्यायालये ताकदवान नाहीत, हात बांधलेत असं आम्ही म्हणू का? सरन्यायाधीशांचा सरकारला सवाल

Diabetes in Kids: तुमच्या मुलांना डायबिटीजचा धोका आहे का? 'ही' ८ लक्षणे वेळेत ओळखून घ्या योग्य काळजी

SCROLL FOR NEXT